जळगाव जिल्ह्यात केवळ २० टक्के लसीकरण

जळगाव जिल्ह्यात केवळ २० टक्के लसीकरण
corona vaccine
corona vaccine

जळगाव : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७ लाख ४० हजार ३२२ नागरिकांनी पहिल्या व दूसऱ्या टप्प्यातील लस घेतली आहे. तर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ८७ हजार २६१ लाभार्थ्यांना लसीकरण लाभ देण्यात आला. राज्यात २६ जून रोजी विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ३२ हजार २०१ नागरिकांचे लसीकरण झाले. १८ वर्षावरील नागरिकांची संख्या ३५ लाख गृहित धरल्यास (२०१०) केवळ २० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. ८० टक्के नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचीत आहेत. लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात सहाव्या तर नाशिक विभागात दुसऱ्या स्थानावर आला आहे. (jalgaon-district-coronavirus-vaccination-six-number-state-ranking)

corona vaccine
हृदयद्रावक..काका– पुतण्याला मृत्‍यूने गाठले; सकाळी तलावात पोहतांनाची घटना

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे वयोगटावरील ४ लाख १९हजार ११३ तर दुसर्‍या टप्प्यात ९९हजार ९४८ लाभार्थ्यांनी लसीकरण केले. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ७७ हजार २६१ नागरिकांचे पहिल्या व ९हजार ९८९ दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण झाले. जिल्ह्यात आतापर्यत ७ लाख ४० हजार ३२२ नागरिकांचे लसीकरण झाले असून यात १८ विभागाव्दारे ५ लाख २८ हजार ३५७ पहिल्या, १ लाख ४३ हजार ३५५ दुसर्‍या डोस घेतलेल्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंन्द्रांवर अनुक्रमे १ लाख ९० हजार ७२२ पहिल्या टप्प्यात तर ४४ हजार १५८ दुसऱ्या टप्प्यात तसेच उपकेंद्रांवर ५५ हजार ९१९ पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात ५हजार ७८० नागरिकांचे लसीकरण झाले.

corona vaccine
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मामानेच केले कृत्‍य

लसीकरणात भुसावळ अग्रेसर

तालुकास्तरावरील लसीकरणात भुसावळ तालुका अग्रेसर असून येथे ४० हजार ४०८ पहिल्या टप्प्यासह दुसर्‍या टप्प्यात १५ हजार ४७५ नागरिकांना लाभ देण्यात आला. त्याखालोखाल रावेर, अमळनेर, चाळीसगाव, यावल, पाचोरा असा क्रम असून जामनेर तालुक्यात सर्वात कमी लसीकरण नोंदवले गेले आहे.

२६ जून रोजी राज्यभरात ५ हजार ७५६ केंन्द्रांवर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामोहिमेंतर्गत जिल्ह्यात ३२ हजार २०१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात आरोग्य विभागाचे ९७, फ्रंट लाईन वर्कर्स ६३२, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २४ हजार ३८४ तर ४५ वर्षे वयोगटावरील ७ हजार ८८ नागरिकांचे लसीकरण झाले.

दररोज २५ हजार लसीकरणाचे नियोजन

जिल्ह्यात सर्व केंद्रावर २५ हजार नागरिकांना दिवसभरात लसीकरण होवू शकेल एवढ्या पायाभुत सुविधा आहेत. मात्र लशींच्या पूरवठ्यावर लसीकरण अवलंबून असते.जशा लसींचा साठा असतो तसे लसीकरण होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ‘सकाळ’ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com