esakal | जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी, वाघूरचे आठ दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी, वाघूरचे आठ दरवाजे उघडले

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात शनिवारी पहाटे तीनपासून विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट व अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतातून (Farm) वाट काढणेही कठीण झाले आहे. वाघूर धरणाच्या (Waghur Dam) लाभक्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून दहा हजार ६० क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे.

हेही वाचा: खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले,त्यांना उपचाराची गरज-गिरीश महाजन


जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून सर्वच नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. शनिवारी काही ठिकाणी पहाटे तीन तर काही ठिकाणी पहाटे सहा वाजेपासून जोरदार अतिवृष्टी झाली. सोबतच विजांचा कडकडाटही झाला.

हेही वाचा: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव..

जळगाव शहरात जोरदार पाऊस

जळगाव शहरात पावसाचे पाणी गटारावरून वाहू लागल्याने वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने नेणे कठीण झाले होते. अनेकांची वाहने अडकून पडली होती. सकाळी अकरानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते. सर्वच नद्यांना पूर आलयाने नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपली गुरेढोरे नदीपात्रात नेऊ नये, नदीकाठापासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

loading image
go to top