esakal | दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव..
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


पिंपळनेर : कुडाशी पैकी आंबापाडा (ता. साक्री) येथे गुरुवारी रात्री दारूसाठी पैसे देत नाही याचा राग आल्याने वृद्ध आईचे डोके जमिनीवर आपटून तिला मुलाने (Boy) ठार (Murder) केल्याची घटना (Mother) घडली. पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे.

हेही वाचा: धुळे एलसीबी पोलिसांनी हरियानाची टोळी पकडली


दारूसाठी जन्मदात्या आईचा जीव घेणाऱ्या संशयित मुलाचे नाव गुलाब बंडू बागूल (वय ४२) असे आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने आई सुमनबाईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गुलाब नेहमीच पैशांसाठी त्रास देत असल्याने वैतागलेल्या सुमनबाईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. हीच गोष्ट तिच्या जिवावर बेतली. आई पैसे देत नाही याचा राग मुलगा गुलाबने तिचे डोके धरून ते घराच्या भिंतीवर दोन-तिनदा आपटले. आईचे डोके भिंतीवर आपटल्याने ६० वर्षीय सुमनबाई गलितगात्र होऊन जमिनीवर कोसळल्या. तरीही गुलाबचे मन शांत झाले नाही. त्याने पुन्हा जमिनीवर पडलेल्या आईचे डोके फरशीवर आपटले. यातच सुमनबाई मरण पावली. ही घटना घडली त्या वेळी पाऊस पडत असल्यामुळे सुमनबाईच्या ओरडण्याचा कुणाला आवाज आला नाही. तर घटनेनंतर गुलाब गल्लीत फिरू लागला.

हेही वाचा: जळगावमध्ये ७ ऑक्टोबरला राज्यस्तरीय कापूस परिषद


दरम्यान, या गोष्टीची वाच्यता होऊन सुमनबाईचे दीर चुनीलाल तानाजी बागूल यांना समजताच त्यांनी गल्लीत फिरणाऱ्या गुलाबला हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तर त्यांनी घरी येऊन पाहिले असता सुमनबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. या प्रकरणी चुनीलाल बागूल यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करून गुलाब बागूल यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

loading image
go to top