esakal | जळगाव जिल्हा कारागृहात महिला कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Jail

जळगाव जिल्हा कारागृहात महिला कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्हा कारागृहात (District Jail) न्यायालयीन बंदिवासात असलेली महिला संशयित महिला कैद्याने (Female prisoners) कारागृहात बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न (Hagging suicide attempt) केल्याची घटना घडली. सकाळी बंदिवानांच्या गणतीवेळी बाथरूमचे नाव करून आत बॅरेकमध्ये जात गळफास घेतला. मात्र वेळीच महिला कारागृहरक्षकाला संशय आल्याने डोकावून बघितल्यावर हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

जिल्‍हा कारागृहातील महिला विभागातील बॅरेक क्रमांक २ मध्ये अनिता राजा चावरे (वय ५०) ही महिला संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर झालेल्या अत्याचारप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली असून, २९ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी सकाळी महिला कारागृहरक्षक उषा भोंबे ड्यूटीवर आल्या. महिला बंदिवानांना चहा-नाश्तावाटप केल्यावर कारागृह अधीक्षकांचा नियमित राउंड असल्याने महिला कैद्यांची गणती करून त्यांना रांगेत बसविण्यात आले होते. महिला कैदी बाहेर असताना अनिता बाथरूमला जाण्याचे सांगून पुन्हा बॅरेकमध्ये गेली. याच वेळेस भोंबे बॅरेकच्या मागील साफसफाई झाली का याची पाहणी करून डोकावून बघत असतानाच हा प्रकार लक्षात आला. तशाच अवस्थेत अनिताला कंबरेपासून वर उचलून धरत भोंबे यांनी आरडाओरडा केल्यावर इतर बंदिवान महिलांनी मदतीसाठी धाव घेतली. गोंधळाचा आवाज अधीक्षक कार्यालयापर्यंत जाऊन अधीक्षक वांढेकर यांच्यासह सर्वच येऊन धडकले.

हेही वाचा: आमदारांनी आश्वासन दिले..आणि शेतकऱ्यांनी उपोषण स्थिगीत केले


बिच्छान्याचा टेकू अन्‌ साडीचा गळफास
कारागृहातील बॅरेक नंबर-२ मध्ये बंदिवान असलेल्या सर्व महिला बंदिवानांचे बिच्छाने एकत्र करून अनिताने त्याचा स्‍टूल म्हणून वापर केला. साडीचा काठ चिरून त्याची दोरी करत पंख्याच्या कडीला अडकवून गळफास घेतला. मात्र वेळीच उषा भोंबे यांच्या लक्षात आल्याने अनिताचा जीव वाचला. उषा भोंबे यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात अनिता चावरे यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिस नाईक पुरुषोत्तम वाघळे तपास करीत आहेत.

loading image
go to top