esakal | जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणात जलसाठा कमी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणात जलसाठा कमी!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव ः जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे (Rain) धरणांच्या (Dam) साठ्यात वाढ होत आहे. नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. मोठ्या धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा (Water reserves) , तर लहान धरणांत आता साठा वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिली होती. यामुळे धरणाच्या साठ्यात आता कुठे वाढ होण्यास सुरवात झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत अनेक धरणे भरली होती.

(jalgaon district large dams reduce water reserves)

हेही वाचा: अवैध्य चालत्या फिरत्या बायोडिझेल पंपावर पोलिसांची कारवाई

जूनमध्ये सुरवातीस पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने ओढ दिली. यामुळे २५ जून ते १० जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे उकाडा होऊन शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. नंतर मात्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या गुरुवारी (ता. १५) धुव्वाधार पाऊस झाला. नंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. हतनूर धरणाचे दहा दरवाजे मंगळवारी (ता. २०) सुरू होते. बुधवारी (ता. २१) सहा दरवाजे बंद केले असून, चार दरवाजे सध्या सुरू आहेत. सततच्या पावसाने काही शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पिकांची उगवणही चांगली झाली आहे.

हेही वाचा: जळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्रचंड हाल!

Dam

Dam

धरणातील साठा असा
धरण--आजची टक्केवारी--गेल्या वर्षाची टक्केवारी
हतनूर--११.६१--१८.४३
गिरणा--३७.२५--३८.५१
वाघूर--६२.९०--७८.८३
अभोरा--८१.८८--८०.१५
मंगरूळ--९९--१००
सुकी--३६.७७--९२.२८
मोर--५४.३७--६२.२५
अग्नावती--०.००--१००
हिवरा--१.६९--१००
बहुळा--१८.५०--५८.९३
तोंडापूर--४२.५८--६९.०३
अंजनी--२८.०७--७०.२५
गूळ--१४.४६--६.३३
बोरी--४९.११--७४.५४
भोकरबारी--१४.४६--६.३३
मन्याड--२२.५८--२९.०४

loading image