esakal | मार्केट यार्ड बंदने १५ कोटींची उलाढाल ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

मार्केट यार्ड बंदने १५ कोटींची उलाढाल ठप्प

मार्केट यार्ड बंदने १५ कोटींची उलाढाल ठप्प

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


जळगाव : केंद्र सरकारच्या (Central Government) कडधान्यावरील साठा (Cereal stocks) मर्यादेच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील (Market Committees) शेतमालाशी संबंधित सर्व व्यवहार शुक्रवारी (ता. १६) दिवसभर बंद होते. या बंदमुळे जिल्ह्यातील १० ते १५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला, तर व्यापाऱ्यांचे बंद आंदोलन १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी केला आहे.
(jalgaon district market committees closed movement market yard merchants association)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;जळगावात १४२ टन ऑक्सिजनची निर्मीती


सरकारचे जाचक धोरण
केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्यामुळे व आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्याच्या व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्र सरकारने २ जुलैस परिपत्रक काढून डाळींच्या साठवणुकीवर तत्काळ स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. व्यापाऱ्यांनी या धोरणाविषयी केंद्र सरकारचा निषेध केला.

हेही वाचा: चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात

धोरण मागे घ्यावे
केंद्र सरकारने कडधान्य स्टॉक लिमिटचे धोरण मागे घ्यावे, खुल्या आयातीला दिलेली परवानगी रद्द करावी, तेलबियांच्या भावाबाबत धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी असोसिएशनचे उपाध्यक्ष कल्पेश संघवी (पाचोरा), ईश्‍वर कोठारी (जामनेर), मधुकर येवले (चाळीसगाव), सचिव यतीन कोठारी (अमळनेर), सहसचिव नरेंद्र लढ्ढा (भुसावळ), जितेंद्र बोथरा (चोपडा), अतुल अग्रवाल (रावेर), हितेश नेमाडे (सावदा), राहुल गुजराथी (फैजपूर), अशोक चौधरी (यावल), भरत शेंडे (पाचोरा), अल्केश ललवाणी (जामनेर), विशाल करवा (धरणगाव), संदीप जाखेटे (एरंडोल), माणकचंद अग्रवाल (बोदवड), दिलीप मंत्री (कासोदा) यांनी केली आहे.

loading image