जळगावातील गुन्हेगारी संपविण्यासाठी 'मास्टर प्लॅन'-डीआयजी शेखर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IG Police B.G. Shekhar

जळगावातील गुन्हेगारी संपविण्यासाठी 'मास्टर प्लॅन'-डीआयजी शेखर

जळगावः जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढलेली गुन्हेगारी (Crime), शस्त्राच्या धाकेवर वाढणारी गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांनी (Police) 'मास्टर प्लॅन' (Master plan) आखला आहे. त्या अंतर्गत गुन्हेगारांचे शोध करण्यात आणि त्यानंतर मोक्का (Mocca), एमपीडीए(MPDA), हद्दपारी आदींसारखी कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आज नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर (Inspector General of Police B.G. Shekhar) यांनी दिली.

हेही वाचा: परवानगी मिळाल्यास मुंबई लोकलच्या धर्तीवर पॅसेंजर धावणार

जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारी तसेच दोन दिवसात घडलेल्या गोळीबारांच्या घटनेवर आज नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक जळगाव दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलतांना ते म्हणाले, की जळगाव शहरात गोळीबाराच्या घडलेल्या दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून घडलेल्या आहे. त्यामुळे या गुन्हेगारीला आवळ घालविण्यासाठी तसेच अवैध्य शस्त्र बाळगून गुन्हे करणारे सगळ्या गुन्हेगारांची पाच वर्षाची कुंडल्या काढून त्या गुन्हेगारांचे शोध, जामिनावर सुटलेले आहे का? ते सध्या कुठे आहेत याचा शोध घेवून प्रत्येक पोलिस स्टेशनला दत्तक गुन्हेगार योजना लागू करत असून प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला दोन गुन्हेगार चेंकीगला देणार आहे. अवैध्य शस्त्र वापरणाऱ्या विरोधात आता कडक पावले उचली जातील त्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार असून काही दिवसात तुम्हाला कारवाई दिसून येतील असे पोलिस महानिरीक्षक शेखर म्हणाले.

प्रत्येक पोलिस स्टेशनला टारगेट

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महानिरीक्षकांनी प्रत्येक पोलिस स्टेशनला टारगेट दिले असून दोन गुन्हेगारांची पडताळणी करून त्यांना मोक्का, एमपीडीए, हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार तीन महिन्याच्या आत करण्याच्या सुचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यानुसार कारवाई सुरू होतील. रात्री पासून कामाला सुरवात झाली आहे. तसेच अवैध्य सावकारीला बळी पडलेल्यांनी पुढे यावे पोलिसांकडून या सावकारी विरुध्द कारवाई केली जाईल असे असे महानिरीक्षक म्हणाले.

हेही वाचा: पंजोखारा साहिब गुरुद्वाराचा इतिहास आहे रंजक..जाणून घ्या माहिती

बाॅडर काॅन्फरन्स घेतली जाणार

मध्यप्रदेशातून अवैध्य शस्त्र विक्री होत असते यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्र येतात. याबाबत मध्यप्रदेश पोलिस दलासोबत बाॅडर काॅन्फरन्स घेणार असून त्यानंतर कारवाईचे नियोजन केले जाणार असल्याचे महानिरीक्षकांनी माहिती दिली.

Web Title: Marathi News Jalgaon District Police Ready Master Plan End Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..