esakal | मंगरूळ धरण ‘ओव्हर फ्लो’; बारा गावांच्या जलपातळीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Mangrul Dam

मंगरूळ धरण ‘ओव्हर फ्लो’; बारा गावांच्या जलपातळीत वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रावेर : सातपुड्याच्या (Satpuda) कुशीतील भोकरी नदीवरील मंगरूळ हा लघुसिंचन प्रकल्प (Irrigation Project)पावसाने भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून नदीपात्रात येत असून, परिसरातील नदीपात्र खळाळून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात (Rain) ओसंडून वाहणारा हा जिल्ह्यातील पहिलाच मध्यम सिंचन प्रकल्प आहे.

(jalgao district raver mangrul dam overflow increase in water level)

हेही वाचा: ‘अंजनी’चा साठा तीस टक्क्यांवर..पाण्याची समस्या काहीअंशी दूर


या नदीच्या किनाऱ्यावर आणि परिसरात असलेल्या तालुक्‍यातील सुमारे बारा-तेरा गावांच्या भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्यास मदत होणार आहे. आहे. हा प्रकल्प मंगळवारी (ता. २०) ९९ टक्के भरला होता. सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्याने हा प्रकल्प आता १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागला आहे. एकूण ६.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प आणखी काही काळ असाच भरून वाहिला तर पंधरा दिवसांत त्याचे पाणी मुखापर्यंत पोचेल. मंगरुळ, पिंप्री, केऱ्हाळा बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, कर्जोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. या गावांतील भूगर्भातील पातळी वाढून तेथील विहिरी कूपनलिकांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: चेन्नईमधील या कॅफेमध्ये रूचकर पदार्थांचा नक्की आनंद घ्या!

हतनूर प्रकल्प १४ टक्के भरला
जिल्ह्यात १३ विविध मध्यम जलसिंचन प्रकल्प असून, यापैकी हा पहिलाच प्रकल्प आज भरून ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील ३ मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात १४ टक्के, गिरणा प्रकल्पात ३७.२८ टक्के आणि वाघूर प्रकल्पात ६२.७८ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान रावेर तालुक्यातील अभोडा प्रकल्पात ९१ टक्के आणि सुकी प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा असून, पाऊस वाढल्यास या आठवड्यातच ते पण भरून वाहतील, अशी अपेक्षा आहे.

loading image