esakal | ‘अंजनी’चा साठा तीस टक्क्यांवर..पाण्याची समस्या काहीअंशी दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Anjani Dam

‘अंजनी’चा साठा तीस टक्क्यांवर..पाण्याची समस्या काहीअंशी दूर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एरंडोल : पळासदड (ता. एरंडोल) येथील अंजनी नदीवरील अंजनी प्रकल्पाचा (Ajani dam) साठा ३० टक्क्यांवर पोचल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील (rural areas) अनेक गावांची (Village) पाण्याची समस्या (Water problem) दूर झाली आहे. अंजनी नदीच्या उगम क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

(jalgaon district ajani dam thirty percent water storage)

हेही वाचा: पुण्याच्या चार सराईत गुन्हेगारांना पिस्तूल, काडतुसांसह अटक


पळासदड येथील अंजनी प्रकल्पातील साठ्यात वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अंजनी नदीच्या उगमस्थानापासून प्रकल्पापर्यंत सुमारे १४ बंधारे असून, हे बंधारे पूर्ण भरल्यानंतर प्रकल्पात पाणी येते. अंजनी नदीवरील सर्व प्रकल्प भरल्यामुळे प्रकल्पातील साठ्यात वाढ होत आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांना अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यामुळे प्रकल्पाच्या साठ्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असते. प्रकल्पातील साठ्यामुळे परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होते. प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर साठा झाल्यानंतर अंजनी नदीवरील काळा बंधारा आणि डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तन सोडले जाते. रब्बी पिकांसाठी आवर्तन महत्त्वाचे असते. अंजनी प्रकल्पातून शहरात पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शहराचा विस्तार वाढत आहे.

तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. प्रकल्पाचे वाढीव उंचीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या तीन गावांच्या पुनर्वसनाची समस्या अद्यापपर्यंत न सुटल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा होण्यास अडचणी निर्माण होतात. प्रकल्पात पूर्ण क्षमतेने साठा झाल्यास एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. अंजनी प्रकल्पास १९७७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष कामास १९९२ मध्ये सुरवात झाली. त्यानंतर निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. १९९५ पासून कामास गती मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणात जलसाठा कमी!


प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ
सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रकल्पातील साठा संपुष्टात आल्यामुळे प्रकल्पातील गाळ काढला. त्यामुळे प्रकल्पातील साठ्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे.

loading image