येऊ द्या आपत्ती,आम्ही आहोत सतर्क; शोध बचाव पथके तयार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rescue squads

येऊ द्या आपत्ती,आम्ही आहोत सतर्क; शोध बचाव पथके तयार!


जळगाव ः राज्यात ( Maharashtra) मुंबईसह (Mumbai) इतर जिल्ह्यांत अतिवृष्टी (Heavy rain) झाली आहे. आगामी तीन ते चार दिवस जोरदार पावसाचे (Rain) असल्याने जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा (warning of extreme vigilance) देण्यात आला आहे. तापी नदीला पूर आल्याने सतर्कतेचे आदेश आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही (District Disaster Management Department) आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाला आहे.

(jalgaon district rescue squads formed in each taluka)

जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस होऊन नदी-नाल्यांना पूर आलेला नव्हता. मात्र, सोमवार (ता. १२)पासून हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. तापी नदीकाठच्या गावात पट्टीचे पोहणारे, शोध बचाव करणारे पथके सज्ज ठेवली आहेत. सोबतच सर्व विभागांना नियंत्रण कक्ष सुरू करून २४ तास कर्मचारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

विभागनिहाय मदत व बचाव पथकाची स्थापना करून नोडल अधिकारी नेमले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालये न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रत्येक तहसील, विभाग, जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. महापालिका, पालिकांनाही सतर्क राहून पूर आल्यास योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस, होमगार्ड, कृषी विभाग यांनाही अलर्टचे आदेश आहेत.

rescue squads

rescue squads

...अशी आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
* प्रत्येक तालुक्यात : ३६ सदस्यीय शोध बचाव पथके
* पट्टीचे पोहणारे प्रत्येक तालुक्यात : २५ ते ५०
* सायरन दंवडी यंत्रणा : २५ गावांत कार्यन्वित
* फायबर बोट : चार
* रबर बोट : दोन
* लाइफ जॅकेट : १५०
* लाइफ रिंग : १५०
* सर्च लाइट : १५
* इमर्जन्सी पॉवर लाइट : १५

अतिवृष्टीचा इशारा असो वा नसो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सज्ज आहे. केव्हाही काहीही घडले, तर या यंत्रणेतील संबंधित घटनास्थळी जाऊन शोध बचाव, मदत कार्य करतील. यंत्रणेकडे नवीन साहित्य आल्याने यंत्रणा बळकट झाली आहे.
-नरवीरसिंग रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी