esakal | जळगाव जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच!
sakal

बोलून बातमी शोधा

school closed

जिल्ह्यात वाढत असलेली कोविड रुग्णसंख्या, शाळांमधील पालक- शिक्षक संघाकडून आलेले अभिप्राय पाहता शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ७ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच!

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोना संसर्गाची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रम शाळा, वसतीगृहे ७ डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी काढले आहेत. यामुळे उद्यापासून (ता.२३) शाळा सुरू करण्याचे आदेश रद्द झाले आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने जिल्हा प्रशासनांना अधिकार दिले होते. त्यात ९ ते १२ वीचे वर्ग दोन सत्रात भरविण्यात सांगण्यात आले होते. उद्यापासून शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर खासगी शाळा, महाविद्यालयात खोल्या निर्जंतुकीकरणाची मोहीम होती घेण्यात आली होती. या शाळांच्या तयारीची पाहणी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, इतर अधिकाऱ्यांनी केली होती. 

दरम्यान आज सायंकाळी पाचला जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना वाढीची शक्यता लक्षात घेता. ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले. कोविडचे रुग्णांत होणारी वाढ, दिवाळीनिमित्त नागरिकांचे एकमेकांकडे झालेले येणेजाणे यामुळे कोरोना रुग्ण वाढीच अधिक शक्यता लक्षात घेता. शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

खासगी क्लासेस बंदच! 
अनेक जण खासगी क्लासेस घेतात. विषेशतः दहावी, बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने खासगी क्लासेस चालकांनी ऑनलाइन शिकवण्यावर भर दिला. आता शाळा सुरू होत आहेत. यामुळे खासगी क्लासेसलाही शिकवण्या घेवू द्या अशी मागणी खासगी शिकविणी चालकांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्याकडे केली होती. अशी परवानगी देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यामुळे खासगी क्लासेस बंदच राहतील. 
 
जिल्ह्यात वाढत असलेली कोविड रुग्णसंख्या, शाळांमधील पालक- शिक्षक संघाकडून आलेले अभिप्राय पाहता शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ७ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांनी या काळात ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा. 

- अभिजित राऊत (जिल्हाधिकारी) 
 

संपादन ः राजेश सोनवणे