खानदेशची केळी आता राज भवनात

जळगाव जिल्ह्यात होत असलेले काम कौतुकास्पद असून ते पाहण्यासाठी उत्तराखंड मधूनही शेतकऱ्यांना येथे बोलावण्यात येईल.
Governor Raj Bhavan
Governor Raj BhavanGovernor Raj Bhavan
Summary

राजभवन येथे गणेश हिंगमिरे लिखित 'जी आय मानांकन' आणि 'इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी राइट्स' या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल श्री कोशारी यांच्या हस्ते झाले.

रावेर ः जिल्ह्यातील तांदलवाडी (ता रावेर) येथील जीआय मानांकित केळी आता परदेशापाठोपाठ राजभवनात (Governor Raj Bhavan) पोचली आहे. राजभवनात आज (ता २) आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांना तांदलवाडी येथील युवा प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी (Banana growers) आणि निसर्ग राजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी केळीचा घड आणि केळीपासून निर्मित विविध पदार्थ भेट दिले.

Governor Raj Bhavan
आता मका,ज्वारीच्या मोजणीत वशिलेबाजी; शेतकी संघाचा गजब कारभार!

आज सकाळी ११ वाजता मुंबईतील राजभवन येथे गणेश हिंगमिरे लिखित 'जी आय मानांकन' आणि 'इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी राइट्स' या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल श्री कोशारी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त मेजर जनरल डॉ गिरीजा शंकर मुंगली, रामभाऊ डिंबाळे, सुधाकर आव्हाड आणि अनंत ताकवले उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य सरकारच्या वतीने राज्यातील १४ जी आय मानांकन प्राप्त संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी (ता रावेर) येथील शशांक पाटील या एकमेव युवा केळी उत्पादक शेतकऱ्याचा समावेश होता.

खानदेशी वस्तुंचे प्रदर्शन

या ठिकाणी आयोजित प्रदर्शनात श्री पाटील यांनी आपले बंधू सुमित पाटील यांच्यासह पिकलेली केळी, केळीचा चिवडा, चिप्स, केळीचे पापड, केळीचे पीठ आदी वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनाला ही श्री कोशारी यांनी भेट दिली. तालुका कृषी कार्यालयाचे तंत्रज्ञ व्यवस्थापक चंद्रकांत माळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शशांक पाटील यांनी राज्यपाल महोदयांना केळीचा घड व्यासपीठावर भेट दिला.

Governor Raj Bhavan
जगातील सर्वात मोठ्या 10 रेल्वे नेटवर्क सेवा? कोणत्या घ्या जाणून

खानदेशातील शेतकऱ्यांचे काम कौतुकास्पद

याप्रसंगी बोलताना राज्यपालांनी युवा शेतकऱ्यांनी शिक्षणाचा उपयोग केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे, जळगाव जिल्ह्यात होत असलेले काम कौतुकास्पद असून ते पाहण्यासाठी उत्तराखंड मधूनही शेतकऱ्यांना येथे बोलावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com