जळगाव जिल्ह्याला मिळाल्या ३८ हजार ५०० लशी!

अवघ्या पाच महिन्यात वीस टक्के नागरिकांना लसीकरण झाले.
corona vaccine
corona vaccinecorona vaccine
Updated on


जळगाव ः जिल्ह्यात कोरोना लसींचा (corona vaccination) तुटवडा असल्याने अनेक केंद्रावर लसीकरण बंद (vaccination center close) झाले आहे.यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावर जावूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. आज जिल्ह्यासाठी ३८ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे उद्यापासून सर्व केंद्रावर पूर्ववत लसीकरण सुरू होईल असे माहिती आरोग्य विभागाने (Department of Health) दिली. आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून संबंधित आरोग्य केंद्रावर लस नेण्यासाठी ॲम्बूलन्स आल्याचे चित्र होते. (jalgaon district thirty eight thousand five hundred corona vaccine available)

corona vaccine
ओठांसाठी कोरफड आहे गुणकारी..मिळतात आश्चर्यकारक फायदे!

लसीकरणाच गती कमीच
जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाख ३४ हजार ५६८ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १ लाख ४६ हजार ९२ अशी एकूण पावणे सात लाखावर नागरिकांनी डोस घेतले आहेत. गेल्या १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. अवघ्या पाच महिन्यात वीस टक्के नागरिकांना लसीकरण झाले. लसीकरणाची गती अतिशय हळूवार असल्याने अशाच रितीने लसीकरण सुरू राहिल्यास दोन वर्षापेक्षा अधिक काळ सर्वांना लसीकरणासाठी लागेल. यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात लसीची उपलब्ध कशा रितीने होईल यावर जिल्हा व आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अजून काही वर्षतरी कोरोना लसीकरणासाठी लागतील. तोपर्यंत जिल्ह्यातील विकासात्मक कामे ठप्प राहण्याची भिती आहे.

घरीघरी लसीकरणाबाबत आदेश नाही
पुण्यात घरोघरी लसीकरण करण्याबाबत शासन तयारी करीत आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र घरीघरी लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभागाने काही सूचना, पत्र पाठविले नसल्याचे सांगण्यात आले.

corona vaccine
जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांची पाल आदिवासी पाड्यांना भेट

तिसऱ्या लाटेबाबत सज्जतेचे आदेश
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येणार हे निश्‍चीत नसले तरी जिल्ह्यात सज्जेतेचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला असल्याची माहिती जिल्हा शलय चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. ऑक्सीजन पुरविणारी यंत्रणा, बेड उपलब्धता, आरोग्य कर्मचारी, नसर्से, डॉक्टर, औषधसाठा आदींची उपलब्धता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात दृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

corona vaccine
नवापूरला सागवानी लाकडाचा साठा पकडला; वन विभागाची कारवाई

मोहाडीत ऑक्सीजन प्लांट कार्यान्वीत होणार
मोहाडी महिला रुग्णालयात ऑक्सीजन निमिर्ती प्लांटचा बेस तयार झाला आहे. हवेतील ऑक्सीजन शोषून त्यापासून ऑक्सीजन निमिर्ती करणारा हा ऑक्सीजन जनरेशन प्लांट एक हजार लिटर प्रती मिनीट तयार करणार आहे. आगामी तीन चार दिवसात या प्लांट कार्यान्वीत होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com