जळगावची चिंता वाढली; बोदवडला कोरोनाचे ५ रुग्ण सापडले

जिल्ह्यात समोर आलेल्या ८ पैकी ५ रुग्ण बोदवड तालुक्यातील असल्याने चिंता वाढली आहे.
corona
corona
Updated on


जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने रुग्णसंख्या घटत असताना शुक्रवारी बरे होणाऱ्यांपेक्षा नव्याने आढळून आलेले रुग्ण (corona) अधिक होते. जिल्ह्यात समोर आलेल्या ८ पैकी ५ रुग्ण बोदवड तालुक्यातील असल्याने चिंता वाढली आहे. तर अवघे दोनच रुग्ण आज बरे झाले, त्यामुळे सक्रिय रुग्णही (Active Patient) वाढले आहेत.

corona
पीक पाहणी आता होणार मोबाइल अॅपवर!


जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांत तर सातत्याने नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असे चित्र कायम होते. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या लक्षणीयरित्या घटली होती.

corona
बीएचआर प्रकरणःझंवर नेटवर्किंगमध्ये रिक्षाचालकही भरायचा ई-निविदा

शुक्रवारी मात्र पुन्हा नव्या ८ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार ६५४ झाली. दिवसभरात केवळ २ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ४० हजार ४६पर्यंत पोचला असून हे प्रमाण ९८.१७ टक्के आहे. आज ३ हजार २९६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. शुक्रवारी बोदवडला ५, चोपडा २ व भडगावात १ रुग्ण आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com