esakal | महाराष्ट्र बंदला जळगावात गालबोट; महाविकास आघाडी-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा
sakal

बोलून बातमी शोधा

Fighting

महाराष्ट्र बंद : जळगावात मविआ-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथील शेतकरी (Farmer) हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकार विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे विविध ठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलन (Maharashtra Bandh Andolan) करण्यात आले. त्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे दुपारी महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) सुरू आज दुपारी बंद आंदोलन केले जात असतांना भाजप कार्यकर्ते आणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरा-समोर येवून शाब्दीक वाद झाला. त्यानंतर धक्काबुक्की व हाणामारीची (Fighting) घटना घडली. या घटनेमूळे एकच धावपळ उडाली. या घटनेत माजी नगराध्यक्षसह त्यांचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यात आज महाराष्ट्र बंद ला चांगला प्रतिसाद मिळत असून वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र बंद आंदोलन केले जात असतांना दोन्ही गट महात्मा गांधी विद्यालयाजवळ समोरा समोर आल्याने शाब्दीक वाद झाला. वाद वाढत गेल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाल्याचे माहिती समोर येत आहे. हा वाद आगामी वरणगाव नगरपालिकेची होणारी निवडणूकी पूर्वीच घडला आहे.

आणि समोरा समोर आले..

वरणगाव येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आव्हान करत असतांना तेथे भाजपचे माजी नगराध्यक्ष हे कार्यकर्त्यांसह येवून व्यापाऱ्यांना बंद न करण्याचे सुचना करत होते. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक वाद झाला त्यानंतर धक्काबुक्की होवून मारहाणीची घटना झाल्याची माहिती समोर येत आहे. या काही जण जखमी झाले झाल्याची माहीत समोर येत आहे.

आधीच कोरोनामुळे जनता वैतागली आहे; त्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी बळजबरी बंदचे आवाहन करीत होते. मला काही व्यापाऱ्याचे फोन आले होते. महाविकास आघाडीचे लोक आमच्यावर दबाव आणून बंद करण्याचे सांगत आहे. त्या अनुषंगाने मी व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेण्याकरिता गेलो असता. माझे काही एक ऐकून न घेता मला बेदम मारहाण केली
- सुनिल काळे
माजी नगरअध्यक्ष भाजपा


आम्ही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते नियमानुसार बैठक घेऊन पोलिस स्टेशनला पत्र दिले आणि शहर बंद करीता आवाहन केले. व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना दम देऊन दुकाने उघडण्याचे सांगत होते. त्यावेळी आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, की आपण दुकाने उघडण्यास का सांगत आहेत तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माझी कॉलर पकडून मला मारहाण केली. यावरून पुढे वाद चिघळला.

दीपक मराठे
भुसावळ तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस.

loading image
go to top