जळगाव जिल्ह्यातील भुजल पातळी अद्याप खोलच

Jalgaon Ground Water Level News: दोन महिन्यांचा कालावधी असला तरी विविध गावांतील विहिरी, कूपनलिका यांचे सर्वेक्षण केले.
Well
Well Well

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस (Rain) झाला आहे. मात्र जिल्ह्यातील नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे विहिरी व कूपनलिकेची (Well and borewell) पातळी अद्यापही खालावलेली आहे. जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाचे (Hatnur Dam) ४१ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तापीला महापूर (Flood) आला होता. असे असले तरी गावाकडच्या तालुक्या-तालुक्यातील नद्या अद्यापही दुथडी वाहत नसल्याचे चित्र आहे. नाले कोरडे आहेत. पावसाचे पाणी गावागावांत मुरलेले नाही. त्यामुळे गावागावांतील विहिरी, कूपनलिका यांची पातळी (Ground water level lowered) खोलच आहे.

(jalgaon district well and borewell water level lowered)

Well
फक्त सरकार विरोधात बोलण्यासाठी केंद्राचा राणेंना मिळाला लाडू

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे वर्षभरात जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर या चार महिन्यांत भूजल सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यातील १७८ ठिकाणच्या विहिरींवर सर्वेक्षण केले जाते. त्यात पातळी किती उंचावली आहे किंवा घटली आहे, याची माहिती मिळते. भूजल सर्वेक्षण विभागातर्फे भूजल पातळी मोजण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी असला तरी विविध गावांतील विहिरी, कूपनलिका यांचे सर्वेक्षण केले असता विहिरींच्या पातळीत तसेच बोरवेलच्या पातळीत वाढ झाली नाही.

१०८.८ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू असून, जिल्ह्यात आतापर्यंत १०८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर आहे. तर जूनचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलिमीटर, जुलै १८९.२ मिलिमीटर, ऑगस्ट १९६.१ मिलिमीटर, तर सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १२३.६ मिलिमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मिलिमीटर आहे. जुलैचे सरासरी पर्जन्यमान १८९.२ मिलिमीटर असून, या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात १०८.८ मिलिमीटर म्हणजेच जुलैच्या सरासरीच्या ५७.५ टक्के इतका पाऊस पडला आहे.

जुलैतील तालुकानिहाय पाऊस

जळगाव- ९७.७ मिलिमीटर (४४.६ टक्के), भुसावळ- ६०.०० मिमी (३०.८), यावल- ७६ मिमी (३७.१), रावेर- १०७.८ मिमी (५८.९), मुक्ताईनगर- १०१.२ मिमी (५७.५), अमळनेर- ८७.४ मिमी (४६.६), चोपडा- ९०.५ मिमी (४२.३), एरंडोल- १६७.५ मिमी (८७.४), पारोळा- १३८.६ मिमी (७६), चाळीसगाव- १४४.७ मिमी (९१.८), जामनेर- ११३.१ मिमी, (५७.२), पाचोरा- ११५.३ मिमी (६४), भडगाव- ११५.८ मिमी (६६.९) धरणगाव- १२८.५ मिमी (५६.७), बोदवड- ८९.३ मिमी (४३.९) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १०८.८ मिमी म्हणजेच ५७.५ टक्के पाऊस झाला.

Well
उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नांवर लवकरच जनआंदोलन उभे राहणार


भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पावसाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये भूजल सर्वेक्षण केले जाते. यामुळे किती पाणीपातळी वाढली आहे, याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. सप्टेंबरनंतर पातळीतील वाढीची माहिती मिळेल.

डॉ. अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com