esakal | सातपुड्यातील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद 
sakal

बोलून बातमी शोधा

सातपुड्यातील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद 

पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे.

सातपुड्यातील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद 

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १२५ आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी वॉटर पुरीफायरचे वाटप करण्यात आले. 

वाचा- कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील -

दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नादतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील जामुनझिरा येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला. 

यावेळक्ष रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, युवराज लोणारी, दिलीप सूर्यवंशी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवि राजपूत, परिक्षीत बऱ्हाटे, प्रकाश कासार,क्रांती सुरवाडे,ज्ञानेश्वर मोरे, एच टी फेगडे, परिक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे डी महंत, विजय सोनवणे, बी एन पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, संदिप पाटील, विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदिप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, गिरिराज फेगडे,दीपक महाराज, छाया पाटील,दिपक जावळे, विनोद चोरडीया, के टी तळेले या दात्यांचे सहकार्य लाभले. 

श्रीकांत जाेशी, ज्ञानेश्वर घुले, देव सरकटे, प्रसन्ना बाेराेले, शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, प्रदीप साेनवणे, जीवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे, मंगेश भावे,अमित चाैधरी,अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 


चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य 
अंतर्नादतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली. 

उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप 
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सहसमन्वयक हरीश भट यांनी दिली.  

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top