esakal | एसटीचा दिवाळीत होतोय धुमधडाका; रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

ग्रामीण, शहरी भागातील महिलांनी माहेरी जाण्यासाठी एस.टी.बसेस, रेल्वेला आज गर्दी केल्याचे दिसून आहे. यंदा रेल्वेने आरक्षणाशिवाय प्रवास नाकारला असल्याने अनेकांनी रेल्वे आरक्षणावर भर दिला.

एसटीचा दिवाळीत होतोय धुमधडाका; रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नसल्याने गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीच्या मंगल पर्वातील भाऊबिजेचा सण मोठा असतो. यादिवशी बहिण भावाला ओवाळून दिर्घायूष्यासाठी. त्या बदल्यात भाऊ बहिणाला दिवाळीची भेट देवून तिच्या संरक्षणाची ग्वाही देतो. यामुळे भावाला ओवाळण्यासाठी महिला आपल्या माहेरी जातात. 
ग्रामीण, शहरी भागातील महिलांनी माहेरी जाण्यासाठी एस.टी.बसेस, रेल्वेला आज गर्दी केल्याचे दिसून आहे. यंदा रेल्वेने आरक्षणाशिवाय प्रवास नाकारला असल्याने अनेकांनी रेल्वे आरक्षणावर भर दिला. तर काहींनी एस.टी.ने जाणे पसंत केले. रेल्वेला आरक्षणाशिवाय प्रवेशाची होणारी गैरसोय पाहता एस.टी. अनेक मोठ्या शहरांमध्ये, जिल्हा अंतर्गत जादा बसेस सोडून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली. आज व उद्या (ता.१६), परवा (ता.१७) असे तिनही दिवस एस.टी.बसेस जादा सोडण्यात येणार आहे. 

वर्षभरानंतर निघाल्‍या माहेरी
भाऊबिज व पाडवा एकत्र आल्याने सर्वांचीच धांदल उद्या उडणार आहे. पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते. नंतर भाऊबिजेसाठी माहेरी जाते. पूर्वी हे दोन दिवस वेगवेगळे असायचे. यंदा मात्र एकाचदिवशी आल्याने पतीराजाला ओवाळून माहेरी जाण्यासाठी महिलांची धांदल उडणार आहे. 

रेल्वेचे आरक्षण फुल्लं… 
दिवाळी निमित्त आपापल्या गावी जाण्यासाठी नागरिकांनी अगोदरच रेल्वेचे आरक्षण केले होते. यामुळे वीस नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या बहुतांश गाडयांचे आरक्षण फुल्लं आहे. नागरिकांना वेटींग लिस्ट दिले जाते. मात्र ते कन्फर्म झाल्याशिवाय गाडीत प्रवेश दिला जात नाही. किमान वेटींग लिस्टवर गाडीत प्रवेश दिला जावा अशी मागणी प्रवाशांची आहे.