नवी दुचाकी किंमतीपेक्षा स्वस्त..दिपोत्‍सवाच्या पार्श्वभुमीवर तीन ट्रक शहरात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

मुंबई येथून टिव्हीएस, होंडा आणि हिरो कंपनीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात येत असल्याची खात्री झाल्यावरुन पोलिसांनी अजिंठा चौकात (एमएच.४८.ऐ.जी.४२६),(एमएच.४८एजी.१४९३),(एम.एच.४८बीएम.१५५) या तिन्ही ट्रक्स थांबवुन तपासणी केली

जळगाव : जळगाव शहरात होंडा, हिरो आणि टिव्हीएस कंपनीचे अधीकृत डीलर्स असतांना, थेट मुंबईहून स्वस्त किंमतीत दुचाकी मागवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ट्रक ताब्यात घेत तपासणी केल्यावर त्यांच्यात ३० दुचाकी मिळून आल्या आहेत. 

एमआयडीसी पेालिसांत जप्त वाहनांची नोंद घेतल्या नुसार, योगेश अशोक चौधरी, प्राकश जाखेटे आणि किरण बच्छाव यांनी एमआयडीसी पेालिस ठाण्यात लेखी अर्ज केला हेाता. त्यात नमुद केल्या प्रमाणे १३ नोहेंबर रेाजी मुंबई येथून टिव्हीएस, होंडा आणि हिरो कंपनीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात येत असल्याची खात्री झाल्यावरुन पोलिसांनी अजिंठा चौकात (एमएच.४८.ऐ.जी.४२६),(एमएच.४८एजी.१४९३),(एम.एच.४८बीएम.१५५) या तिन्ही ट्रक्स थांबवुन तपासणी केली असता त्यात ०९ होंडा शाईन, हेांडा ॲक्टीवा ०९, युनीकॉर्न०४, हिरो पॅशन प्रो-०१, हिरेा स्प्लेंडर ०१, टिव्हीएस.ज्युपीटर ६, अशा एकुण ३० वाहने मिळून आली होते. ट्रक चालक बाबुराम लल्लन निषाद, राहुल राजमनी यादव आणि गुरुप्रसाद मिश्रा यांना या वाहनांची कागदपत्रे मागीतली असता ती त्यांना दाखवता आली नाही. म्हणुन पेालिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली असून तशी नोंद घेण्यात आली आहे. जळगाव शहरात या कंपन्याचे अधीकृत शोरुम्स असतांना केवळ स्वस्त दरात वाहने मिळत असल्याने मुंबईहून हि वाहने खरेदी केल्याचे सांगण्यात आले. 

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु 
जळगाव ः शहरातील कांचन नगरातील रहिवासी शरद सोनवणे यांच्या दुचाकीला कारचालकाने धडक दिल्याची घटना शुक्रवार(ता.६) रेाजी घडली होती. उपचारासाठी दाखल करतांना त्यांचा मृत्यु झाला. एमआयडीसी पेालिसांत या प्रकरणी कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिस ठाण्यात दाखल तक्रारी नुसार शरद तोताराम सोनवणे त्यांच्या दुचाकीने एस.टि.वर्कशॉप कडून घराकडे येत असतांना त्यांच्या दुचाकीला (एमएच.१९.अे.एक्स १८०) या तवेरा कार चालकाने धडक दिली हेाती. यात शरद सोनवणे यांचा मृत्यु ओढवला असून गंगुबाई सोनवणे यांच्या तक्रारीवरुन कारचालका विरुद्ध एमआयडीसी पेालिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon diwali festival new bike low rate in market