
विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले,
जळगाव : विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाक्यांना बंदी करण्यात आली आहे. असे फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे, त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरिता फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देणा-या सर्व यंत्रणांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
पोलिसांना कळविण्याचे आवाहन
विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले, स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल. अशी बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे