esakal | BREAKING एकनाथ खडसेंचे मुंबईला कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

एकनाथ खडसे यांची गेल्या आठवड्यात चाचणी करण्यात आली होती. यात अहवाल निगेटिव्ह आला होता. पुन्हा त्यांनी चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत त्‍यांनी व्टिट करून माहिती दिली होती.

BREAKING एकनाथ खडसेंचे मुंबईला कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्‍यांना उपचारासाठी लागलीच मुंबई येथील बॉम्‍बे हॉस्‍पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे घेतलेले दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्‍याची माहिती समोर आली आहे. 

ज्‍येष्‍ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे व त्‍यांची नातवंडे गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित आढळून आले होते. त्‍यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्‍यांच्या संपर्कात असलेले एकनाथ खडसे यांची गेल्या आठवड्यात चाचणी करण्यात आली होती. यात अहवाल निगेटिव्ह आला होता. तरी देखील खडसे निवासस्थानी विलगीकरणात होते. मात्र, तीन-चार दिवसांपासून खडसेंनाही ताप, सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी पुन्हा त्यांनी चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत त्‍यांनी व्टिट करून माहिती दिली होती.

मुंबईला दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्‍यानंतर ते रात्रीच उपचारासाठी मुंबईला रवाना झाले होते. मुंबईच्या बॉम्‍बे हॉस्‍पिटलमध्ये त्‍यांना उपचारासाठी दाखल केल्‍यानंतर त्‍यांची तेथे कोरोना चाचणी करण्यात आली. याठिकाणी दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.