एकनाथ खडसे आल्याने राष्ट्रवादीला मिळणार बळ, तर भाजपला बसणार झळ !

कैलास शिंदे
Thursday, 22 October 2020

ज्या काळी भाजप हा एखादा समाजापुरता मर्यादित पक्ष असल्याचे समजले जात होते अशा काळात खडसेंनी जिल्ह्यात ग्रामीण भागात जाऊन पक्षाची भूमिका समजावून सांगून त्यांनी पक्ष बळकट केले होता.

जळगाव ः जळगाव जिल्हा आणि एकनाथराव खडसे हे समीकरणच आहे. सत्ता कुणाचीही असो, जिल्ह्यात गेल्या किमान 25 वर्षापासून खडसेंचे वर्चस्व राहीले. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठी झळ बसेल आणि राष्ट्रवादिला मात्र बळ मिळणार आहे.

माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन - खडसे

भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यात व राज्यात भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहे ज्या काळी भाजप हा एखादा समाजापुरता मर्यादित पक्ष असल्याचे समजले जात होते अशा काळात जिल्ह्यात ग्रामीण भागात जाऊन पक्षाची भूमिका समजावून सांगून त्यांनी पक्ष बळकट केले होता. एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पाळेमुळे होती त्या त्या ठिकाणी प्रखर विरोध करून भाजप पक्षाला बळ दिले.

जिल्हा परिषदेवर तीस वर्ष वर्चस्व

एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा खालसा करून गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकावला आहे याशिवाय जिल्ह्यातील फैजपूर भुसावळ यावल मुक्ताईनगर वरणगाव महानगरपालिका व नगर परिषद वारी भाजपचा झेंडा फडकवला असेल तसेच जिल्हा बँक जिल्हा दूध संघ यावर सत्ता स्थापन करून सहकार भाजपचे वर्चस्व निर्माण केले आता हे वर्चस्व राष्ट्रवादीकडे जाईल त्यामुळे भाजपला मोठा तोटा होण्याची शक्यता असून जिल्ह्यात भाजपचे नेते यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

शिवसेनाला बळ मिळणार
 महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला ही खडसे यांच्या प्रवेशाचा फायदा होणार विधानसभा निवडणुकीत युती असतानाही भाजपने जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले होते त्यांच्या अद्यापही रागा आहे खडसे यांच्या माध्यमातून शिवसेना भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात आक्रमक होते यांच्या माध्यमातून व तालुक्यात व पक्षाला बळकट बळकटी देण्यासाठी फायदा होईल.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknath Khadse joining the NCP, the NCP will get strength, but the BJP will suffer