esakal | राजीनाम्‍याचे परिणाम राज्‍यभरात दिसतील : खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

जळगावातील मुक्ताई या निवासस्थानी खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. अहमदगरमध्ये भाजपच्या ३१० बुथ प्रमुखांपैकी २५७ सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत खडसेंना विचारले असता ते म्‍हणाले,

राजीनाम्‍याचे परिणाम राज्‍यभरात दिसतील : खडसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत असल्‍याचे म्‍हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. 
जळगावातील मुक्ताई या निवासस्थानी खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. अहमदगरमध्ये भाजपच्या ३१० बुथ प्रमुखांपैकी २५७ सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत खडसेंना विचारले असता ते म्‍हणाले, की संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे. भाजपला राजीनाम्‍याचा हा परिणाम संपुर्ण राज्‍यात पाहण्यास मिळतील; असे सांगत भाजपवर टिका केली.

कार्यकर्‍त्‍यांची गर्दी
धरणगावहून येत असताना खडसे यांच्या वाहनाचे टायर फुटल्‍याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यातून खडसे बालंबाल बचावले होते. यानंतर ते जळगावच्या निवासस्‍थानी आले हेाते. खडसे जळगावात असल्‍याने आज सकाळी कार्यकर्‍त्‍यांनी त्‍यांच्या निवासस्‍थानी गर्दी केली होती.

loading image