esakal | खडसेंच्या डाव्या हातावरील उलटा स्‍वस्‍तीक काय सांगतो?
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

खडसेंच्या डाव्या हाताच्या मनगटावर उलटे स्‍वस्‍तिक का? याचा उलगडा देखील यातून समजणार आहे. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. २) या ग्रंथाचे प्रकाशन भाजप नेत्यांच्या हस्ते होणार आहे. 

खडसेंच्या डाव्या हातावरील उलटा स्‍वस्‍तीक काय सांगतो?

sakal_logo
By
श्रीकांत जोशी

भुसावळ : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील ‘जनसेवेचा मानबिंदू’ या प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेल्या ग्रंथांत खडसेंच्या अनेक अपरिचित गोष्टींचा उलगडा केला आहे. विशेष म्‍हणजे खडसेंच्या डाव्या हाताच्या मनगटावर उलटे स्‍वस्‍तिक का? याचा उलगडा देखील यातून समजणार आहे. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. २) या ग्रंथाचे प्रकाशन भाजप नेत्यांच्या हस्ते होणार आहे. 

अवश्‍य वाचा - तर ‘विराट’चा जीवच गेला असता; गळ्यात अडकली होती डबी

महाराष्ट्राच्या राजकारणात खडसे यांचे नेतृत्व नेहमीच वादळी राहिले आहे. विधानसभा व सभेतील भाषणातून त्यांनी आपली आभ्यासुवृत्ती सिद्ध केली आहे. नेहमीच चर्चित असलेल्या या नेतृत्वावर प्रा. डॉ. नेवे यांनी पीएच.डी. केली आहे. शोधप्रबंधातील काही मुद्दे व अपरिचित अनेक गोष्टी मिळून त्‍यांनी २२० पानांचा ग्रंथ लिहिला आहे. खडसे यांचे राजकीय, सामाजिक व कौटुंबिक पैलुंचा उलगडा ग्रंथांत होतो. राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे यांची ग्रंथाला प्रस्तावना आहे. शिवाय विविध पक्षनेत्यांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या खडसे यांच्याबद्दलच्या भावना आहेत. 

प्रकाशन सोहळा ऑनलाईनही
प्रकाशन सोहळा प्रत्यक्ष व ऑनलाइन भव्य होणार आहे. मुख्य कार्यक्रम मुक्ताईनगरला श्री. खडसे, खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदींच्या उपस्थितीत होईल. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ऑनलाइन प्रकाशन करतील.  

उलट्या स्वस्तिकचा उलगडा 
श्री. खडसे यांचे बालपण व तारुण्यातील अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात आहे. एकेकाळी गाजलेले जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरच्या नाझी पक्षाचे चिन्ह असलेले उलटे स्वस्तिक चिन्ह खडसे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर कसे काय आहे, याचा उलगडाही केला आहे. 


संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top