आता मतदारकार्ड मिळणार एका क्लिकवर

Jalgaon Election Department : निवडणूक विभागाने सर्वच कामकाज मतदारांसाठी ऑनलाइन केले आहे.
Voter card
Voter cardVoter card


जळगाव ः लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकीत (Lok Sabha, Assembly elections) मतदार कार्डाशिवाय (Voter card) मतदारांना मतदान करता येत नाही. गेल्या निवडणुकांत काही मतदारांना मतदारकार्ड मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात, निवडूक कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला होता. मात्र आता मतदारांना मतदार कार्डासाठी निवडणूक कार्यालय किंवा तहसील कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. निवडणूक विभागही (Election Department) आता तंत्रज्ञानाच्या (Technology)सहाय्याने अपडेट होत असून, नवमतदार नोंदणीपासून मतदार ओळखपत्र मिळेपर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. यामुळे आता मतदानासंबंधित सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने ‘एन.व्ही.एस.पी.’(नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल) (National Voter Service Portal) अॅपद्वारे होत आहे.

(election department new voter registration and voter card online service portal start)

Voter card
‘जळगावकर’ म्हणायचीही आता लाज वाटते..!


पूर्वी मतदान करण्यासाठी ओळख पटावी म्हणून रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन आदी पुरावा ग्राह्य धरला जात असे. आता मात्र गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदार कार्डाशिवाय मतदान केंद्रात प्रवेश दिला जात नाही. यामुळे मतदारांना ओळखपत्रासाठी फोटो काढून संबंधितांकडे जमा करावे लागत होते. नंतर ओळखपत्र घेण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. आता मात्र निवडणूक विभागाने सर्वच कामकाज मतदारांसाठी ऑनलाइन केले आहे. यामुळे नवीन मतदार नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी सहा क्रमांकाचा अर्ज, मतदारयादीत असलेले नाव रद्द करण्यासाठी सात क्रमांकाचा अर्ज, चुकांची दुरस्ती करण्यासाठी आठ क्रमांकांचा अर्ज वरील पोर्टलवर उपलब्ध असतो.
पोर्टल सुरू केल्यानंतर त्यावर सूचना येतात त्याप्रमाणे अर्ज भरावा लागतो. सांगितलेले डॉक्युमेंटस जोडावे लागतात. ते सबमीट केल्यानंतर मतदारकार्ड केव्हा उपलब्ध होईल, असा संदेश येतो. त्यादिवशी पुन्हा पोर्टलवरून आपल्या नावाचे मतदारकार्ड डाउनलोड करता येते. घरबसल्या संगणकावर ही कामे करणे सोपे आहे.

Voter card
जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या सत्तरच्या टप्प्यात

२९ हजार दुबार नावे काढली
जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्याच्या मतदारयादीतील २९ हजार मतदारांची दुबार नावे होती. ती नावे खात्री करून काढली आहे. ११९ नावे अद्याप काढणे बाकी आहे. यापुढील काळात मतदार ओळखपत्रावर संबंधित व्यक्ती व त्याचाच फोटो असणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या मतदारांनी ओळखपत्रासाठी फोटो दिलेला नव्हता अशांकडून फोटो घेऊन तो त्यांच्या ओळखपत्रावर सबमीट केला आहे. नावातील काही चुकांच्या दुरस्त्याही मतदारांनी सांगितल्यानुसार सुरू असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी ‘सकाळ’ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com