
जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या सत्तरच्या टप्प्यात
जळगाव : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या आता सत्तरच्या टप्प्यात आली आहे. चाळीसगाव वगळता आता जळगाव शहरासह सर्व तालुक्यांत सक्रिय रुग्णसंख्या दहाच्या आत आली आहे. रविवारी नवे चार रुग्ण आढळून आलेत, तर तेवढेच चार रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) झाले. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.
(jalgaon district corona infatuation and active patient is low)
हेही वाचा: कोविड नियमांचे पालन करुन यंदा लालबागच्या राजाचा दरबार सजणार
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख सुरू असून, महिनाभरापासून रुग्णसंख्या अगदीच दहा-वीसच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पहिल्या लाटेपेक्षा तिपटीने कमी झाली आहे. रविवारी प्राप्त तीन हजार ७३६ चाचण्यांच्या अहवालात अमळनेर एक व चाळीसगाव तीन, असे अवघे चार नवे रुग्ण आढळून आले. तर तेवढेच रुग्ण बरेही झाले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६०५ झाली आहे, तर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९५३ वर पोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटून ७७ झाली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील स्थिती चांगली असताना चाळीसगाव तालुक्यात मात्र दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळ जळगाव शहर व अन्य सर्व तालुक्यांतील सक्रिय रुग्णसंख्या दहाच्या आत असताना चाळीसगाव तालुक्यात ही संख्या ३९ आहे.
हेही वाचा: शुल्क सवलतीवरून संस्थाचालकांची धाव राजभवनावर, घेणार राज्यपालांची भेट
सहा तालुक्यांत शून्य रुग्ण
धरणगाव, रावेर, जामनेर, एरंडोल, बोदवड आणि पारोळा या सहा तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीत एकही सक्रिय रुग्ण नाही. आगामी २८ दिवस याठिकाणी नवीन रुग्ण आढळून आले नाहीत, तर हे तालुके कोरोनामुक्त होतील.
Web Title: Marathi News Jalgaon District Corona Infatuation And Active Patient Is Low
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..