esakal | अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर
sakal

बोलून बातमी शोधा

Niranjan Narkhede

अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : ऑटोमोबाईल (Automobile), कृषी, घरगुती उपकरणे आणि अन्य क्षेत्रातील मशिनरीसाठी उपयुक्त ठरणारे ‘सिंटर्ड’ तंत्रज्ञान (‘Sintered’ technology) विकसित करून त्याला जगभरात वेगळी ओळख मिळवून देण्याची किमया मूळ जळगावच्या व सध्या पुणेस्थित अभियंत्याने साधली आहे. हे तंत्रज्ञान (Technology) दोन दशकांपूर्वीच विकसित करून निरंजन नारखेडे ‘मेक इन इंडिया’ (Make in India’) असो, की ‘स्टार्टअप’ (‘Startup) अशा संकल्पनांचे ‘पायोनिअर’ ठरले आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रातील ही आहेत प्रसिध्द प्रमुख ठिकाणे


मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या निरंजन यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान आणि साधलेल्या प्रगतीचा जळगाव- पुणे- विश्‍व हा प्रवास म्हणजे सचोटी, परिश्रम आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. निरंजन यांचे वडील मधुकर नारखेडे येथील एम. जे. कॉलेजमधून रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झाले. आई मंगला गृहिणी. बारावीपर्यंतचे शिक्षण जळगावला घेतल्यानंतर त्यांनी बी.ई. (मेकॅनिकल) पुण्यातून ६-६ महिन्यांच्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग अर्थात ‘सॅन्डविच’ स्वरूपातून पूर्ण केले.

असा रोवल पाया
इंजनिअरिंगच्या अंतिम वर्षाला असताना, त्यांनी बॉयलयरसाठी लागणाऱ्या बर्नर गन्स बनविणारी लहान कंपनी सुरू केली. या कंपनीचा व्याप त्यांनी मुद्दामच मर्यादित ठेवला. नंतर बी. एस. ठाणेकर यांच्या रूपाने त्यांना ‘गॉडफादर’ मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन यांनी विविध क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या यंत्रांचे तंत्रज्ञान सिंटर्ड (Sintered) विकसित केले. आणि इथूनच त्यांचा ‘मेक इन इंडिया’चा प्रवास सुरू झाला.

२ लाख ते ३०० कोटी
मुळात सिंटर्ड तंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी त्यावेळच्या इंजिनिअरिंगमध्ये कुठलाही शिकविण्याचा, अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. मात्र, निरंजन यांनी स्वत: अभ्यास, संशोधनाद्वारे त्यावर काम केले. वडिलांनी दोन लाख रुपये व्यवसायासाठी म्हणून भांडवल दिल होते. गेल्या २० वर्षांत निरंजन यांच्या ‘सिंटर्ड’ने उत्पादन व निर्यात क्षेत्रात देशात व विदेशातही लौकिक प्राप्त केल्यानंतर त्यांची उलाढाल आज तीनशे- सव्वा तीनशे कोटींचा आकडा गाठतोय.

हेही वाचा: भारतातील ही आहेत बेस्ट वाॅटर पार्क..!

विदेशातही निर्यात
सिंटर्ड तंत्रज्ञान विकसित करुन ते अन्य कंपन्यांना पुरवठा करणार्या देशात व जगातही बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या आहेत. याप्रकारचे उत्पादन घेणारी यंत्रणा उभारण्यासाठी मोठे भांडवल लागते, त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन निरंजन यांनी ते उभारले आणि उद्योग नावारुपास आणला. मेटल पावडर वापरुन या कंपनीत गिअर्स बनवले जातात, ५० टक्के उत्पादन कॅनडा, मेक्सिको, जर्मनीत निर्यात होते.

‘ग्रीन’ टेक्नॉलॉजी
अन्य उत्पादनांमध्ये १० ते १५ टक्के वेस्टेज असताना या उत्पादन प्रक्रियेत जवळपास शून्य टक्के वेस्टेज असल्याने हे उत्पादन ‘ग्रीन’ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जाते. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यासाठी ‘सिंटर्ड’चे उत्पादन अशी वाहने बनविण्यासाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे गिअर बॉक्स तयार करणारा E- Geartz हा प्लांट नव्यानेच सुरु करण्यात येत आहे.

५ वर्षांत हजार कोटींचे लक्ष्य
सध्या निरंजन यांच्या कंपनीवर एक हजारावर कुटुंब अवलंबून असून, पैकी २० टक्के जळगाव जिल्ह्यातील आहेत. कोरोना काळातील दोन्ही लॉकडाउनमध्ये कंपनीने ३० टक्के विकासदर कायम राखला. येत्या ५ वर्षांत कंपनी एक हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठेल, असा विश्‍वास ते व्यक्त करतात.

हेही वाचा: रोजगार सेवकांच्या मागणीला 'लिंबुपाण्या'चा गोडवा


खरेतर जळगाव जिल्हा, खानदेशातून पुण्यात नोकरी करणारे हजारो तरुण आहेत, पण ‘नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा.’ हा मंत्र सुरवातीपासूनच अंगीकारला. आईवडिलांसह भाऊ भरत, पत्नी सोनल यांचेही या प्रगतीत योगदान आहे. सोनलने स्वत: तिची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली असून, तीही प्रगतिपथावर आहे.
-निरंजन नारखेडे

loading image
go to top