esakal | राजकारणाच्या 'साखरे'मुळे रोजगार सेवकांच्या मागणीला 'लिंबुपाणी'चा गोडवा
sakal

बोलून बातमी शोधा

उपोषणाची सांगता

रोजगार सेवकांच्या मागणीला 'लिंबुपाण्या'चा गोडवा

sakal_logo
By
- संजय पाटील

पारोळा : येथील पंचायत समितीच्या आवारात ग्रामरोजगार सेवकांचे विविध मागण्या मंजुरीसाठी रोजगार सेवक उपोषणाला बसले यावेळी मागण्या मंजुर होत नाही तोवर आम्ही उपोषण सोडणार नाही.अशी भुमिका रोजगार सेवक संघटनेचे सुरेश पाटोळे व सहकारी यांनी घेतली.यावेळी रोजगार सेवक हा ग्रामीण भागाचा काम करणारा दुवा आहे.यासाठी उपोषण स्थळी नगराध्यक्ष करण पाटील,शिवसेना जिल्हाप्र मुख डाँ हर्षल माने व कृऊबा समिती सभापती अमोल पाटील यांनी भेट देवुन संबंधित अधिकार्यांशी चर्चा करुन रोजगार सेवकांचे प्रश्न सोडविण्याचे सांगितल्याने रोजगार सेवकांच्या उपोषणाला राजकीय मंडळी साखर मिळाल्याने लिंबुपाणीला गोडवा मिळुन मागण्या मंजुरीला गतीमानता येईल अशी चर्चा दिवसभर शहरात दिसुन आली.

यावेळी नगराध्यक्ष करण पाटील यांनी व खा.उन्मेष पाटील,जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी संवाद साधून विषय मार्गी लावण्याची विनंती केली त्यावर जिल्ह्याधिकारी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विषय मार्गी लावण्याचे आश्वसन दिले.

तर शिवसेना जिल्हाप्रमुख डाँ हर्षल माने यांनी रोजगार सेवकांच्या विविध मागण्याबाबत गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली असता गटविकास अधिकारी यांनी सदर मागणीचा पाठपुरावा बाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने डाँ माने यांचे हस्ते लिंबुपाणी देवुन उपोषणाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

रोजगार सेवकांच्या मागण्याबाबत शासनकडे पाठपुरावा करु -अमोल पाटील

रोजगार सेवकांचे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचे व महत्वपुर्ण आहेत.याबाबत आमदार चिमणराव पाटील यांचे मार्फत शासन स्तरावर हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा केला जाईल.असे कृऊबा समिती सभापती अमोल पाटील यांनी रोजगार सेवकांना सांगुन गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना गावात विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

याबाबत युनियन मार्फत वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपाच्या समस्या मांडून त्यांचे निराकरण न झाल्याने ग्रामरोजगार सेवकांनी ता,14रोजी पंचायत समिती आवारात उपोषण केले होते.

यावेळी उपोषणकर्त्याची राजकिय पदाधिकारी यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या समस्या आणि व्यथा जाणून घेतल्या यावेळी गटविकास अधिकारी विश्वासात घेत नाही.अरेरावी करतात आवेशात बोलतात अश्या व्यथा ग्रामरोजगार सेवकांनी मांडल्या व विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली यावर स्वतः जातीने लक्ष घालून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या मार्गी लावण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांनी सकारात्मक भुमिका घेतली.यावेळी जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी आधिकारी डाँ.पंकज आशिया यांचेशी भ्रमणध्वनी वर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

या आहेत मागण्या

मुंदाणे प्र उ येथील ग्राम रोजगार सेवक सूर्यभान पाटील यांच्यावर बेकायदेशीर पणे कामावरून कमी करण्याचा तक्रारी अर्ज निकाली काढावे,16 मार्च 2021 पासून ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंतचे ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मान धन मिळावे, ग्रामरोजगार सेवकांचे थकित असलेले टी.ए.डी.ए. बिल मिळावे,नमुना एक मजूर नोंदणी फॉर्म ,नमुना चार कामांची मागणी फॉर्म ,नमुना सात मजुराला काम दिलेल्या बाबतचा फार्म, जॉब कार्ड प्रत वरील विषयानुसार स्तरावरून समस्या योग्य निराकरण करण्यात यावे यासाठी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांनी उपोषणाला सुरुवात केली यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुका अध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर भोई, युनियन चे सदस्य लहू पाटील, सूर्यभान पाटील, रमेश वंजारी, जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, कविता पाटील, समाधान पाटील ,संजय पाटील ,जगदीश पाटील ,प्रदीप पाटील, विनोद सैंदाणे, उत्तम पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील ,भरत राठोड, नाना पाटील, प्रमोद पाटील ,सुनील पाटील, अजित पाटील, राहुल पाटील, रामदास पाटील, भूषण महाजन, उमेश पाटील ,कैलास पाटील, प्रकाश पाटील ,ज्ञानेश्वर पाटील, नंदू पाटील ,सजन पाटील, शिवदास खैरनार, अनिल पाटील, विकास पाटील, योगेश पाटील ,भीमराव जावळे आदी ग्राम रोजगार सेवक उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.यावेळी नगराध्यक्ष,डाँ हर्षल माने व अमोल पाटील गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top