esakal | बनावट शिक्‍के अन्‌ खोट्या सह्या..वाळूठकेदाराचा उपद्व्याप
sakal

बोलून बातमी शोधा

fake stamp

बनावट शिक्‍के अन्‌ खोट्या सह्या..वाळूठकेदाराचा उपद्व्याप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : आव्हाणी (ता.धरणगाव) येथील वाळू ठेका गुंड आणि ग्रामस्थांच्या त्रासामुळे वाळू ठेकेदाराने सरेंडर केला आहे. हा ठेका रद्द झाल्याने ठेक्यासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळवण्यासाठी बालाजी कुपन ऑनलाइन लॉटरीचा प्रोपायटर नईम शेख अकबर (रा. एमआयडीसी) याने चक्क खोटे महसुली शिक्के आणि अव्वल कारकूनची (fake stamps false signatures jalgaon collector office) बनावट सही करून शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. वेळीच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने जिल्हापेठ पेालिसठाण्यात वाळू ठेकेदारा विरुद्ध गुन्हा दाखल झाला. (jalgaon-fake-stamps-false-signatures-jalgaon-collector-office)

हेही वाचा: ते गेले पण त्‍यांच्या नावाचा वापर; डॉ. सुपेकरांच्या नावे ५० हजारांची लूट

जळगाव जिल्‍हाधिकारी कार्यालयातील (Jalgaon collector office) सामान्य शाखेत कार्यरत अव्वल कारकून राजेंद्र सुदाम पाटील (रा. द्रोपद्रीनगर) यांनी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील वाळूचा ठेका एमआयडीसी येथील रहिवासी नईम अकबर शेख यांनी घेतला होता. आव्हाणी येथील ग्रामस्थांच्या होत असलेल्या त्रासामुळे हा ठेका रद्द करुन ठेका घेण्यासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळावी यासाठी नईम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (५ एप्रिल ते १७ मार्च २०२१ दरम्यान) अर्ज केला. या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत कार्यरत अव्वल कारकुन राजेंद्र पाटील यांच्या बनावट स्वाक्षरी तसेच कार्यालयाचा बनावट शिक्का वापरुन हे प्रकरण गौणखजिन विभागात नईक शेख याने सादर केला होता. मात्र, या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बारीक चौकशी केल्यावर १५ मार्च ते ५ एप्रिल या कालखंडात अव्वल कारकुन राजेंद्र पाटील सुटीवर असल्याचे आढळून आले.

अव्वल कारकुनाची खोटी सही

ग्रौणखनिज विभागात नईम शेख याने सादर केलेल्या अर्जाची तपासणी दस्तुरखुद्द अप्पर जिल्‍हाधिकारी महाजन यांनी केली. अर्जावर पोहच म्हणून अव्वल कारकून राजेंद्र पाटील यांची स्वाक्षरी तसेच त्यांच्या टपाल शाखेचा शिक्का असल्याने गौणखजिन विभागातील गवई यांनी (१६ एप्रिल) संबंधित प्रकाराबाबत राजेंद्र पाटील यांना विचारणा केली. अर्ज या तारखेत सादर झाला त्या दरम्यान १५ मार्च ते ५ एप्रिलच्या काळात मी, रजेवर असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. त्याबाबतचा खुलासाही राजेंद्र पाटील यांनी सामान्य शाखेचे तहसीलदार यांना दिला आहे.

बनावट शिक्के आले कोठून?

वाळू ठेकेदार नईम शेख याने दिलेल्या संबंधित अर्जावर राजेंद्र पाटील यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्काही बनावट असल्याचे कार्यालयीन चौकशीत निष्पन्न झाले. घडला प्रकार जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे आल्यावर त्यांनी याबाबत सामान्य शाखेचे तहसीलदार यांना गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राजेंद्र पाटील यांनी काल मंगळवारी २५ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कागदपत्रासह तक्रार दिली. या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नईम शेख अकबर याच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.