ते तर केंद्रातील सरकारलाही सरळ करू शकतील : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

ज्‍या शेतकऱ्यांनी त्यांना दिल्लीच्या तख्वावर बसविले, त्याच तख्तावरून खाली उतरविण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आडव करू नका, तो तुम्हाला आडवं करून टाकेल;

जळगाव : शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे. एका खुंब्यात बैलाला सरळ करू शकतो. मग हे तर केंद्रातील सरकार आहे; ते देखील सरळ करू शकतील असा टोला राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्राच्या भाजप सरकारला लगावला आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिवादन कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे सुरू असलेल्‍या आंदोलनाबाबत पालकमंत्री पाटील म्‍हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्‍ताने डॉ. आंबेडकर यांनी देशातील शेतकरी आणि जनतेसाठी कायदे बनविले आहेत. मात्र आज शेतकरी अडचणीत आहेत. कायद्याची पायमल्ली करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. शेतकरी हा देशाचा कणा असून ५२ टक्के रोजगार देणारी फॅक्टरी म्‍हणजे शेतकरी. त्याच शेतकऱ्यावर आज केंद्र सरकार अन्याय करीत आहे, हे मोठे दुर्दैव आहे. पण शेतकऱ्याची ताकद मोठी आहे. ते केंद्र सरकारला निश्‍चितच त्यांची ताकद दाखवतील. 

तर खालीही उतरवतील
केद्रांतील सरकार शेतकऱ्यांवर योजना करून अन्याय करीत असेल तर दिल्ली लांब नाही, अजूनही तीन वर्षे बाकी आहे. ज्‍या शेतकऱ्यांनी त्यांना दिल्लीच्या तख्वावर बसविले, त्याच तख्तावरून खाली उतरविण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आडव करू नका, तो तुम्हाला आडवं करून टाकेल; असे सांगत शेतकरी एका खुंब्यात बैलाला सरळ करू शकतो हे तर सरकार आहे असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer strike in central goverment gulabrao patil statement