पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट

Jalgaon Farmer News : पेरणीनंतर उगवण झालेल्या पिकांना पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांची पुन्हा पेरणी वाया गेल्या.
पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट
Updated on

कळमसरे (ता. अमळनर) : तालुक्यातील मारवड मंडलात पावसाचे (Rain) अत्यल्प प्रमाण असल्याने सद्य:स्थितीत दुष्काळसदृश परिस्थिती असून, तिबार पेरणीचे (Sownig) संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून पीकविमा (Crop insurance) व दुष्काळी मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मारवड मंडलातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांना निवेदन दिले.

(jalgaon farmers third time sowing crisis no rain)

पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट
कारागृहातील ‘डबल मर्डर’मधील बंदिवानाचा मृत्यू


या वर्षी हवामान खात्याने पावसाचा चुकीचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन असा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्ण तयारी करून अगदी रिमझिम पावसात पेरण्या केल्या. मात्र, मारवड मंडलासह तालुक्यातील पश्चिम व उत्तरेला तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. एक जून ते २७ जुलैपर्यंत फक्त ४५ मिलिमीटर पाऊस झाला असून, तोही रिमझिम झाल्याने हजारो रुपयांचे बियाणे टाकूनही पावसाच्या हुलकावणीने पुन्हा पेरणी करावी लागली. मात्र, त्यानंतरही पाऊस न झाल्याने पुन्हा तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पेरणीनंतर उगवण झालेल्या पिकांना पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांची पुन्हा पेरणी वाया गेल्याने शेती काळीशार नजरेस पडत आहे. दरम्यान, निवेदन देताना शेतकरी दिलीप पाटील, जिजाबराव पाटील, जयवंत पाटील, ज्ञानेश्वर पवार, बापू महाले, साहेबराव पाटील, पांडुरंग पाटील, जगन्नाथ पाटील, अनिल पाटील, शांताराम चौधरी, किशोर पाटील, गोकुळ पाटील, श्यामकांत शिंदे आदी उपस्थित होते.

पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट
मध्य प्रदेशातील ही आहेत सुंदर ठिकाणे..तुम्ही पाहून व्हाल थक्क



शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्या
जून, जुलै दोन महिने होऊनही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा व दुष्काळी मदत जाहीर करावी, यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की मारवड मंडलात संबंधित अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करावी. शासनाचा निकषाप्रमाणे तत्काळ पीकविम्याबाबत कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा, तसेच दुष्काळी अनुदान द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Tukaram Mundhe?
Crime
Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Marathi News Esakal
www.esakal.com