
निम्मेपेक्षा कमीदरात ट्रॅक्टर मिळत असल्याने करे यांनी मित्र बारसे यांना माहिती दिली. देाघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली.
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर बारसे कॉलनीतील रहिवासी शेतकरी अशोक विश्वनाथ बारसे (वय-५५) यांनी ओएलएक्स या ऑनलाईल वाहन विक्री ॲपवरील ट्रॅक्टर आवडले होते. स्वराज-४४७ ट्रॅक्टर अवघ्या २लाख ३० हजारात विक्री होत असल्याची भुरळ पडल्याने बारसे यांनी संबधीतांना संपर्क करुन ऑनलाईन पद्धतीने रोखरक्कम देऊनही ट्रॅक्टर मिळत नसल्याने फसवणुक झाल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अशोक बारसे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, त्यांचा मित्र धनराज भगवान करे, याने ओएलएक्सवर स्वराज-७४४ हे पाच वर्षे वापरलेले सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर विक्रीची जाहिरात पाहिली. निम्मेपेक्षा कमीदरात ट्रॅक्टर मिळत असल्याने करे यांनी मित्र बारसे यांना माहिती दिली. देाघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोडी बोलणीत ठरले होते.
आर्धी रक्कम दिली आणि ट्रॅक्टर देण्याचा दिला नकार
त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबर ला नरेश कुमार याचे कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खत्यावर दानाबाजार शाखेच्या स्टेटबँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले. फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जर विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.