जळगाव जिल्ह्यात ७८१ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर !

देविदास वाणी
Tuesday, 3 November 2020

जिल्ह्यासह राज्यात कोरोनो संसर्गाच्या प्रादुर्भाव मार्चअखेरपासून सुरू झाला. यामुळे एप्रिल ते जून महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रद्द झाल्या होत्या.

जळगाव ः जिल्ह्यातील ७८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा लवकरच बिगूल वाजण्याची शक्यता आहे. आज ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे इच्छुकांना आता आपण कोणत्या प्रभागातून उभे राहू शकतो याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. 

आवश्य वाचा- महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !

कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होऊ लागलाच पूर्वी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार केली होती. त्यावर हरकती मागवून त्यात दुरस्तया करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेवरून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 

 

कोरोनामूळे रद्द झाला होत्या निवडणूका

जिल्ह्यासह राज्यात कोरोनो संसर्गाच्या प्रादुर्भाव मार्चअखेरपासून सुरू झाला. यामुळे एप्रिल ते जून महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रद्द झाल्या होत्या. जून मध्ये कोरोना संसग अधिक वाढल्याने मुदत संपलेल्या व जून ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्त्या करण्यात आल्या आहे. 

 

युवा वर्गाला प्राधान्य 
ग्रामीण भागात मात्तबरांबरोबरच युवा वर्गाला उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाते. यंदा नेमके काय चित्र असेल ? जून्यांबरोबरच नवीन उमेदवारांना संधी मिळते की ? सर्वच ठिकाणी नवीन उमेदवार उभे केले जातात याबाबत ग्रामीण भागात उत्सुकता आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Final ward composition of Gram Panchayat elections announced in Jalgaon district