esakal | देशातली पहिली काळ्या ग्रेनाईटची ५४ फुटाची हनुमानमुर्ती जळगावात साकारली जाणार 
sakal

बोलून बातमी शोधा

देशातली पहिली काळ्या ग्रेनाईटची ५४ फुटाची हनुमानमुर्ती जळगावात साकारली जाणार 

राजस्थानच्या भिलवाडा येथून १५ ट्रॉल्यांतून ७१० टनाचे ग्रेनाइट मागवण्यात येत आहे. त्यापासून श्रीहनुमानाची मूर्ती साकारली जाणार आहे. आता पर्यंत ७ ट्रॉल्या भरून ग्रेनाईट मंदिरात आणण्यात येत आहे.

देशातली पहिली काळ्या ग्रेनाईटची ५४ फुटाची हनुमानमुर्ती जळगावात साकारली जाणार 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील दुरदर्शन केंद्रा लागून स्वामिनारायण मंदिराचे बांधकाम सुरू आहे.या ठिकाणी काळ्या ग्रेनाइटमध्ये देशातील सर्वप्रथम असणारी ५४ फुटी हनुमानाची मूर्ती साकारली जाणार असुन लवकचर मुर्ती तयार करण्याच्या कामाला सुरवात होणार आहे. दोन वर्ष मुर्ती साकारणाचे काम सुरू राहणार आहे. 

जळगाव शहरातील महामार्गावरील दुरदर्शन केंद्रा लगत स्वामी नारायण मंदिर तयार केले जात आहे.  या मदिराच्या परिरातच देशातील सर्वप्रथम काळ्या ग्रेनाईटची ५४ फुट उंच हनुमानजीची मुर्ती साकारली जाणार आहे. मुर्ती निर्माण साठी राजस्थानातील भिलवाडा येथून १५ ट्रॉल्यांतून त्यासाठी ग्रेनाइट मागवले जात आहेत. टप्याटप्याने ते जळगावात पोहोचत आहेत. तब्बल ६० शिल्पकार विलोभनीय मूर्ती बनवणार आहेत. गुजरात, सारंगपूर येथील श्रीकष्टभंजनदेव हनुमान मंदिरातर्फे शास्त्री हरीप्रकाशदासजी, स्वामी विवेकसागरदासजी यांनी ही मूर्ती जळगावला अर्पण केली. संपूर्ण मूर्ती काळ्या ग्रेनाइटमध्ये असेल.

 
दोन वर्षाचा लागणार कालवाधी 
हनुमानजीची मुर्ती ही राजस्थानी शिल्पकार व कारागीर घडवणार आहेत. त्यासाठी दीड-दोन वर्ष लागतील. डिसेंबर २०२२ पर्यंत ही मूर्ती तयार होऊन श्रीस्वामिनारायण मंदिरासोबतच दर्शनास उपलब्ध होईल.
 
 
जळगावात रुजले स्वामिनारायण संप्रदायाचे बिज 
​स्वामिनारायण संप्रदायाचे कुलदैवत हनुमानजी महाराज आहेत. सुमारास २१५ वर्षांपूर्वी श्रीस्वमिनारायण भगवान नीलकंठ वर्णी वेशात भारत वर्षाचे विचरण करीत करीत जळगाव नगरीमध्ये आलेले होते. जळगावमध्ये फकीरचंद सेठ यांनी त्यांना फलाहार करविला होता. आणि त्या काळापासूनच जळगावमध्ये स्वामिनारायण संप्रदायाचे बीज रुजले गेले.  
 
पंधरा ट्रॉल्यांतून येतोय ग्रेनाइट
राजस्थानच्या भिलवाडा येथून १५ ट्रॉल्यांतून ७१० टनाचे ग्रेनाइट मागवण्यात येत आहे. त्यापासून श्रीहनुमानाची मूर्ती साकारली जाणार आहे. आता पर्यंत ७ ट्रॉल्या भरून ग्रेनाईट मंदिरात आणले आहे. यात हनुमानाची गदा, मुख, छातीचा समोरील भाग, दोन्ही हाताचे पंजे, पितांबर या भागांचा समावेश आहे. मंदिरातील संत व भक्तांनी त्यांचे विधिवत पूजनही केले.
 
 
मूर्तीचे निर्माणकर्ता
ह्या मूर्तीचे प्रेरक व निर्माणकर्ता गुरुवर्य स्वामी गोविंदप्रसाददासजी व शास्त्री पुरुषोत्तमप्रकाशदासजी हे आहेत 
या मूर्तीची मुख्य शीला १०० फुटी ट्रक मध्ये आणण्यात येणार आहे ती थोड्याच दिवसांमध्ये जळगावात पोहोचणार आहे.

असे आहे मुर्तीचे वैशिष्ट

- ५४ फूट उंची
- २४ फूट रंदी
- गदा २४ फूट उंच व १३ फूट रुंद
- मूतींचे वजन ५०० टन पेक्षाही जास्त
ृ मूर्तीच्या चरणांच्या खालील बैठकीचे (बेस) वजन २२० टन