‘रास्ता रोको’ करतांना  ४४ जणांनी मास्क लावले नाही; पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

देविदास वाणी
Saturday, 26 September 2020

सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता निष्काळजीपणाने मानवी जीवि.तास व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात घालून साथीचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याप्रकरणी. 

जळगाव ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक विधेयकांच्या विरोधासाठी बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क न लावणे व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्कांसाठी केंद्र सरकारविरोधात व अन्यायकारक कामगार कायदे हाणून पडण्यासाठी विरोधी सर्वपक्षीय संघटनेकडून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांभोरी नदीपुलाजवळ शुक्रवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलकांनी चेहऱ्यावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जमावबंदीचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी न करणे, बेकायदेशीरपणे महामार्गावर एकत्रित येऊन जमाव जमवून दोन्ही बाजूंची वाहने अडवून ठेवणे; त्याप्रमाणे कोरोना संसर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता निष्काळजीपणाने मानवी जीवितास व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात घालून साथीचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा 
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक अब्दुल रज्जाक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विनोद देशमुख, अब्दुल रऊफ अब्दुल रहिम, शेख मोहसीन शेख युसूफ, मोहम्मद फारुख मोहम्मद अली कादरी, शेख तन्वीन शेख मसूद, विकास विठ्ठल चौधरी, शेख उमर शेख फारुख, विक्रम मधुकर पाटील, श्रीकांत तात्या मोरे, उमेश संतोष पाटील, राजेश गोविंदा कोळी, मोहम्मद अरबाज अन्सार पिंजारी, फारुख खान आयुब खान, विक्की अशोक घोरपडे, फारुख शेख अब्दुल्ला, अल्ताब शेख हुसेन, सय्यद चॉंद सय्यद अमीर, स्मिता बाबूराव देशमुख, जमील शेख शफी, गणेश माणिक महाजन, विशाल प्रभाकर वाघ, किरण कडू वाघ, अमोश अशोक कोल्हे, मनोज लीलाधर वाणी, सचिन प्रल्हाद धांडे, नाना सुभाष महाले, प्रमोद बळिराम पाटील, मोहम्मद शफी शेख अब्दुल्ला, संजय प्रताप चव्हाण, रहिम खान अकिल खान, मुदस्सर शेख मुजाहिद, सलमान खान अजीज खान, अकिल खान गुलाम खान, हितेश सुभाष पाटील, पराग रवींद्र घोरपडे (सर्व रा. जळगाव), सुनील मार्तंड साळुंखे (रा. फैजपूर), मनोज डिगंबर चौधरी (रा. आवार, ता. जळगाव), नारायण नामदेव चौधरी (रा. धरणगाव) आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Fourty fore people were charged for not wearing a face mask during crime was filed