मित्राला पार्टिला बोलाविले...त्यालाच दिला धोका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

जळगाव शहरात वाहन चोरीचे गुन्हे प्रचंड वाढले आहे. गुन्हेशाखेचे एक स्वतंत्र पथक त्यासाठी कार्यरत असून वाहन चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांच्या टोळ्या पाचोरा तालूक्‍यात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.

जळगाव : जलसंपदा खात्यात कार्यरत किसन जगताप यांचे मित्र आणि पाचोऱ्यातील अट्टल गुन्हेगार दोघांनी त्यांना पार्टिचे आमंत्रण दिले. पार्टि झाल्यावर त्याची दुचाकी अलगद लंपास केली. गुन्हेशाखेच्या पथकाने दोघा भामट्यांना पाचोरा येथून अटक केली आहे. 

हेपण वाचा - कोविड सेंटरमधून पंधरा जणांनी काढला पळ...स्वॅब घेतल्यानंतर कोरोनाची भिती 

जळगाव शहरात वाहन चोरीचे गुन्हे प्रचंड वाढले आहे. गुन्हेशाखेचे एक स्वतंत्र पथक त्यासाठी कार्यरत असून वाहन चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांच्या टोळ्या पाचोरा तालूक्‍यात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून निरीक्षक बापु रोहम यांच्या पथकातील अशरफ शेख, मुरलीधर बारी, नरेंद्र वारुळे चोरट्यांचा शोध घेत होते. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी संदिप बापूराव चव्हा (वय 30), गोकुळ रामदास राखपसरे (वय 27) या दोघांना ताब्यात घेतले. वाहन चोरीची चौकशी करत असतांना त्यांनी जळगाव शहरातून ज्युपीटर दुचाकी चोरल्याची कबुली दिली. 

पोलिसांचा दणक्‍याने खरी हकीकत समोर 
दोघांनी चोरी केलेली दुचाकी (एमएच.19. सी.के.9005) हि पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाकी दाखविली. यानंतर दोघानी गुन्ह्यातील फिर्यादी किसन जगताप आमचे मित्र असून त्यांना 19 जुन रोजी पार्टीसाठी बोलावुन दुचाकी लंपास केल्याची कबुली दोघांनी दिली. दोघांही दुचाकी चोरट्यांना रामानंदनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon friend invite party and two wheeler chori two friend