कोविड सेंटरमधून पंधरा जणांनी काढला पळ...स्वॅब घेतल्यानंतर कोरोनाची भिती 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

कोविड केअर सेंटरमधून शनिवारी सायंकाळी पंधरा कोरोना संशयीत रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यात मुकटी व हेंकळवाडीतील रुग्णांचा समावेश आहे.

धुळे : कोरोना व्हायरसची भिती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली आहे. बाहेरून आल्यानंतर आपण कोणाच्या संपर्कात येवून आपल्याला तर लागण झाली नाही ना..याची एक वेगळी भिती आहे. अशीच लक्षण आढळून आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले. परंतु अहवाल येण्यापुर्वीच पंधरा जणांनी कोविड सेंटरमधून पलायन केल्याचा प्रकार धुळे शहराजवळील नगावबारी येथील बाफना हॉस्पिटलमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. 

आवर्जून वाचा - लॉकडाउनप्रश्‍नी ठाकरे सरकारचा दबाव...भाजपचा आरोप 

बाफना हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमधून शनिवारी सायंकाळी पंधरा कोरोना संशयीत रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यात मुकटी व हेंकळवाडीतील रुग्णांचा समावेश आहे. याबाबत कोविड केअर सेंटरच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पश्‍चिम देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे. नगावबारी येथील कोविड केअर सेंटरमधून मुकटी येथील 3 जण व हेंकळवाडीतील 7 जण तसेच सायंकाळी साडेसात वाजता मुकटीतील आणखी 5 जण असे 15 जण पळून गेले. 

अहवाल अजून प्रलंबित 
कोरोना संशयितांचे कोरोना तपासणी साठी नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. परंतु, त्यांचे कोरोना तपासणीचे अहवाल येण्याआधीच या संशयितांनी रुग्णालयातून पळ काढला. यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोविड सेंटरमधून पळून गेलेल्या पंधरा जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule covid center Fifteen saspected corona patient run away