अंत्यविधीसाठी फक्त 20 जणांना परवानगी 

collector dhakne
collector dhakne
Updated on

जळगाव : "कोरोना' रुग्णांची संख्या वाढत असली, तरी जिल्ह्यात अजूनही अंत्यविधीसाठी गर्दी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या संसर्गाला आळा बसण्यासाठी अंत्यविधीसाठी गर्दी न करता वीसपेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. 

हेही पहा - धक्‍कादायक : 82 वर्षाची वृद्धा त्यात कोरोना पॉझिटीव्ह, रूग्णालयातून गायब 

जिल्ह्यात दिवसेंदिवस "कोरोना' रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे क्षेत्रीय स्तरावर माहिती घेतली असता, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे "कोरोना'चा संसर्ग वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल, अशा सूचना असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी वीसपेक्षा जास्त जणांनी उपस्थित राहू नये, तसेच मृतदेह हाताळताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे. 

ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास त्वरित उपचार घ्या 
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असले, तरी नागरिक उपचार घेण्यास टाळाटाळ करीत असून, "कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे. यासंदर्भात काढलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, की जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी क्षेत्रीय स्तरावर घेतलेल्या माहितीनुसार, असे निदर्शनास आले आहे, की नागरिकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असली, तरी ते उपचार करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असले, तरी यादरम्यान नागरिक सविस्तर माहिती देत नाहीत. तसे न करता कुटुंबातील व्यक्तींना आढळून येणाऱ्या लक्षणांची माहिती, कुटुंबातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सदस्यांना असलेल्या कोणत्याही प्रकारची लक्षणे (ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे) आढळून आल्यास नजीकच्या सरकारी, खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com