धक्‍कादायक : 82 वर्षाची वृद्धा त्यात कोरोना पॉझिटीव्ह, रूग्णालयातून गायब 

civil
civil
Updated on

जळगाव : भुसावळ येथील 82 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेला उपचारासाठी शहरातील कोविड रुग्णालयातील वार्ड क्रमांक 7 मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु तीन दिवसांपासून ही महिला वॉर्डातूनच बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

न्हावी येथील मूळ रहिवासी असलेली महिला भुसावळला वास्तव्यास आहे. वृद्धेच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात असलेल्या 82 वर्षीय वृद्धेसह सर्व कुटुंबाला भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात क्‍वारंटाईन करण्यात आल्यानंतर अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान या 82 वर्षीय महिलेची प्रकृती खालावल्याने आधी रेल्वे हॉस्पिटलमध्ये नंतर शहरातील कोविड रुग्णालयात 31 मेस दाखल करण्यात आले होते. 

अशी आली घटना उघडकीस 
वृद्धेच्या सुनेचा देखील अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर वृद्ध महिलेला कोविड रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड क्रमांक 7 मध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी वृद्धेच्या नातेवाइकांनी या ठिकाणावरील डॉक्‍टरांसोबत संवाद साधला असता. यावेळी डॉक्‍टरांनी वॉर्डबॉयला त्या महिलेची चौकशी करण्यासाठी पाठविले. त्या वॉर्डबॉयने ही महिला गेल्या तीन दिवसांपासून म्हणजेच 2 जूनच्या दुपारपासून या ठिकाणी नसल्याचे समोर आले आहे. 

डॉक्‍टरांनी दिली नातेवाइकांना चुकीची माहिती 
त्या वृद्धेच्या नातूने कोविड रुग्णालयातील एका डॉक्‍टरसोबत संवाद साधत आजीची विचारपूस केली. यावेळी त्या डॉक्‍टरने तुमची आजी सापडली असून आम्ही त्यांना वॉर्डक्रमांक 9 मध्ये दाखल करीत असल्याचे सांगितले. मात्र दोन दिवसानंतर पुन्हा आजीची चौकशीसाठी त्या डॉक्‍टरांना फोन केला असता आजी सापडलीच नसल्याचे समोर आले आहे. डॉक्‍टरांनी देखील त्या आजीबाबत नातेवाइकांना चुकीची माहिती दिली आहे. 

पोलिसांना दिली तोंडी माहिती 
वॉर्ड क्रमांक 7 मधील कोरोनाबाधित वृद्ध महिला तीन दिवसांपासून गायब असल्याचे समजताच याबाबतची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांकडून अद्यापदेखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. आज दुपारच्या सुमारास पोलिसांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली असता त्यांनी तोंडी नोंद असल्याचे सांगितले. 

वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ 
कोविड रुग्णालयातून बाधित महिला तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रकारची माहिती नसून ते आतापर्यंत अनभिज्ञ होते. दररोज शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस उघडकीस येत आहे. 

नातेवाइकांचा संताप 
भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये या वृद्ध महिलेला दाखल करण्यात आले होते. परंतु याठिकाणी वृद्ध महिलेवर कुठल्याच प्रकारे उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना जळगावातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचवेळी त्या महिलेच्या सुनेचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाइकांकडून महिलेची विचारपूस केली गेली नाही. यातच ही वृद्ध महिला तीन दिवसांपासून गायब असल्याने रुग्णालय प्रशासनाविरुद्ध नातेवाइकांकडून संताप व्यक्त केला जात होता. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com