ग.स.कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज; ७व्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळणार

पालकमंत्री पाटील यांनी कर्मचारी संघटना आणि ग.स. सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक घेतली.
ग.स.कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज; ७व्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळणार


जळगाव ः येथील ग.स. सोसायटीच्या (G.S. Society) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (Seventh Pay Commission) लागू करण्यात आला असला तरी यासाठीचे अनुज्ञेय फरकाची रक्कम थकीत होती. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांना साकडे घातले असता त्यांनी संस्थेच्या प्रशासकांसोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला. यामुळे आता कर्मचार्‍यांना ३-४ टप्प्यात थकीत रक्कम मिळणार आहे. यातील २ कोटी २० लाख रूपयांचा पहिला टप्पा कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळणार आहे.


ग.स.कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज; ७व्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळणार
मुस्लीम कीर्तनकार हभप शेख महाराजांचे किर्तन सेवा देतांना निधन..

ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून यानुसार त्यांना वेतन मिळत आहे. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार कर्मचार्‍यांना अनुज्ञेय रक्कम ही मिळालेली नसल्याने कर्मचारी नाराज होते. ग.स.सोसायटीची आर्थिक स्थिती उत्तम असून ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेला १३ कोटी रूपयांचा लाभ झालेला आहे. यामुळे संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश प्रदान केला आहे. याच प्रमाणे कर्मचार्‍यांची थकीत असणारी रक्कम मिळावी अशी मागणी सोसायटीच्या कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेतर्फे पालकमंत्री पाटील यांच्याकडे भेटून केली होती. कर्मचार्‍यांनी ही समस्या सोडविण्याचे साकडे पालकमंत्र्यांना घातले होते. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी कर्मचारी संघटना आणि ग.स. सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक घेतली.

ग.स.कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज; ७व्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळणार
चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस..पाचव्यांदा पूर,संपर्क तुटला



मंत्री पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत, सोसायटीने कर्मचार्‍यांची थकीत रक्कम टप्प्यांमध्ये देण्याचा तोडगा सुचविला. कर्मचाऱ्यांची १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२० या दरम्यानच्या फरकाची एकूण रक्कम ही १० कोटी ८१ लक्ष इतकी थकीत आहे. मात्र सोसायटीने यंदा आधीच खूप खर्च केला असल्याने दोन टप्प्यांऐवजी ही रक्कम ३-४ टप्प्यांमध्ये देण्यात यावेत अशी विनंती प्रशासक गवळी यांनी केली. यातील पहिला हप्ता हा २ कोटी २० लाख रूपयांचा देण्यात येणार असून कर्मचार्‍यांनी याला होकार दिला. या निर्णयामुळे ग.स. सोसायटीच्या एकूण ४१७ कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले
कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष संजय नारखेडे, सचिव उज्ज्वल पाटील, खजिनदार अनिल सोनवणे, सदस्य नारायण सोनवणे, मनोज चव्हाण, महेशचंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com