भररस्‍त्‍यात तरूणीची काढली छेळ; मित्रास काढायला लावले फोटो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

नंदूरबार येथून जळगावात आलेल्‍या सागरने हा प्रकार केला. नंदूरबार येथून एका मित्रासह तो जळगावात आला. तरूणीने लग्‍नास दिला म्‍हणून त्‍याने तिला रस्‍त्‍यातच गाठले.

जळगाव : लग्नास नकार दिला म्हणून तरुणीला जबरदस्तीने रस्त्यात अडवून मिठीत घेत चुंबन घेतले. ऐवढ्यावरच तो थांबला नाही तर मित्राला मोबाईलमध्ये याचे फोटो काढायला लावल्याचा प्रकार मेहरुण उद्यानात घडला.

नंदूरबार येथून जळगावात आलेल्‍या सागरने हा प्रकार केला. नंदूरबार येथून एका मित्रासह तो जळगावात आला. तरूणीने लग्‍नास दिला म्‍हणून त्‍याने तिला रस्‍त्‍यातच गाठले. मेहरुण उद्यान असलेल्‍या परिसराकडे त्‍या युवकाने मुलीला अडवून काही अंतरावर घेऊन गेला. एका ठिकाणी थांबून तरूणीला मिठीत घेत जबरदस्तीने चुंबन घेऊ लागला, सदर तरूणीने त्‍यास विरोध केला; मात्र उपयोग झाला नाही. या घडल्‍या प्रकाराने तरूणी भेदरली होती.

मोबाईलमध्ये काढले फोटो
सागर याच्यासोबत आलेला त्‍याच्या मित्राने चुंबनाचे फोटो मोबाईलमध्ये काढले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आई- वडीलांनी तेथे धाव घेत सागरच्या तावडीतून मुलीला सोडविले. याबाबत मंगळवारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यानंतर दोघा तरुणांविरुध्द आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon garden road young man kissed his girl