महाजनांचे अज्ञान, रेकाॅर्डींग काढले तर - अॅड विजय पाटील

भूषण श्रीखंडे
Saturday, 19 December 2020

भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निंभोरा येथे चाकुने धमकावल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून यात माझा काही सबंध नसून यामागे यामागे राजकीय सुड बुध्दी असल्याचे म्हणाले होते. या प्रकरणातील फिर्यादी अॅड. विजय पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

जळगाव ः गिरीश महाजन कायद्या विषयात अज्ञानी असून घडलेला गुन्ह्या ची तक्रार केव्हाही व कोणत्या ही पोलिस ठाण्यात दाखल करू शकतो. मराठा विद्या प्रसारक मंडळाची जागा हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी मंत्री असतांना पोलिस, अधिकाऱयांना हाताशी धरुन माझ्याकडून खंडणी वसुल केली. त्यांच्या सर्व प्रकरणांच्या कागदपत्र माझ्याकडे आहे.  तसेच सिडी, पॅनड्राईव्ह असून योग्य वेळी सर्वासमोर आणेल. त्यांनी केलेल्या कतृत्वाचे भोग त्यांना भोगावे लागेल असे अॅड. विजय पाटील यांनी गिरीश महाजनांच्या आरोपाला उत्तर दिले.

भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निंभोरा येथे चाकुने धमकावल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून यात माझा काही सबंध नसून यामागे यामागे राजकीय सुड बुध्दी असल्याचे म्हणाले होते. या प्रकरणातील फिर्यादी अॅड. विजय पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात पुढे बोलतांना ते म्हणाले, की गिरीश महाजन म्हणत असून तीन वर्ष जुना गुन्हा कसा काय दाखल करू शकतात, तर मग नरेंद्र भास्कर पाटील यांच्या विरोधी खोटा व पंधरा ते विस वर्षापुर्वी घटनेचा गुन्हा कसा दाखल केला. खोटे गुन्हे दाखल  करण्याचा त्यांचा पर्टन असून जामनेर मध्ये त्यांच्या विरुध्द बोलणाऱयांचे तोंड ते असेच बंद करतात असे अॅड. पाटील म्हणाले.

 

दोघांच्या मोबाईलचे सिडीआर काढा 
मविप्र संस्थेची   मोबाईलचे दोघांचे २०१५ पासून सीडीआर काढा कोणचे कोणाशी काय बोलणे झाले सर्वांसमोर येईल. पण त्यांची अडचण असून सीडीआर काढले तर त्यांचे रिटा, मोना, स्विटी, जुही, डॅाली यांच्याशी बोलण्याचे संभाषण बाहेर येतील.  
  

मविप्रची जागा हडप करण्यासाठी खटाटोप 
मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या जागेची जमीन हडप करण्यासाठी गिरीश महाजन हे मंत्री असतांना पोलिस, अधिकारी यांच्या दबावातून आमचा छळ केला. ते करत असलेले आरोप खोटे असून कोणत्या ही दबावातून आम्ही तक्रार दाखल केली नाही. मुळात त्यांना जामनेर, चाळीसगाव, पहुर येथील शैक्षणीक संस्थाच्या जागा हडप केल्या त्या प्रमाणे ही मविप्र संस्थेची जागा हडप पोलिस, अधिकाऱयांच्या दबावातून प्रकार मंत्री असल्याचा दबाव टाकून गिरीश महाजन यांनी केला. 
 

घरकुलच्या आरोपींना त्यांनी वाचविले

घरकुल प्रकरणात सुरेश जैन यांना वाचविण्यासाठी आमच्या साॅ मीलच्या कार्यालयात गिरीश महाजन येवून दोन तास नरेंद्र पाटील व माझ्याशी त्यांनी चर्चा करून माघार घेण्याचा दबाव आणच्यावर आणला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girish mahajan call recording vijay patile press