esakal | गिरीश महाजनांनी उपलब्ध करून दिले दोन ऑक्सिजन टँकर
sakal

बोलून बातमी शोधा

गिरीश महाजनांनी उपलब्ध करून दिले दोन ऑक्सिजन टँकर

गिरीश महाजनांनी उपलब्ध करून दिले दोन ऑक्सिजन टँकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात ऑक्सिजनचा (Oxygen) असलेला तुटवडा लक्षात घेऊन भाजप (bjp)नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दर आठवड्याला ऑक्सिजनचे दोन टँकर (tankar) देण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक टँकर जिल्ह्यात आले आहे.

(girish mahajan provided two oxygen tankers)

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार महाजन यांनी जिल्ह्यात आठवड्याला २० टनचे दोन टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, की जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची टंचाई भासत आहे. खासगी, सरकारी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी स्थलांतरित करावे लागत होते. जिल्ह्याला दर आठवड्याला चाळीस टन ऑक्सिजन लागतो. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व काही मित्रांशी बोलून जिल्ह्यासाठी आठवड्याला दोन टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक टँकर बुधवारी (ता. ५) जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्या ताब्यात ते देण्यात आले आहे. सत्ताधारी आघाडीकडून आमदार महाजन यांच्यावर सातत्याने टीका होत होती. आज त्यांनी कृतीतून उत्तर दिले.

(Girish Mahajan provided two oxygen tankers)