esakal | लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : कोरोनाकाळात (corona) ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे काम मिळवून देणारी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) ठरली आहे. लॉकडाउनच्या (Lockdown) काळात या योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार १३७ मजुरांना(Laborer) हक्काचा रोजगार (Employment) उपलब्ध झाला आहे. २०२०-२१ या वर्षात या योजनेंतर्गत ४६९ कोटी ६१ लाख एवढा निधी मजुरीवर खर्च झाला आहे. (workers lockdown time mnrega scheme nine thousand employment)

हेही वाचा: अवैध वाळू उत्खननाची पाहणी सुरूच; एरंडोल, आव्हाणी गटाची मोजणी

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. अत्यावश्‍यक सेवा तेही काही तासच सुरू आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे तर हाल होत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देत २४८ रुपये रोजंदारी देऊन रोजचा चारितार्थ चालविण्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेने मदत केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचा निर्वाहाचा प्रश्‍न मिटला आहे.

हेही वाचा: निर्बंध काळात ९५ हजार लाभार्थ्यांना शिवभोजन

या योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे करण्यात आली आहेत. त्यात फळबागलागवड, वृक्षलागवड, शोषखड्डे, घरकुल सिंचन विहीर, रस्ते, नाला खोलीकरण, सरंक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत. तर ५४२ शाळांना अत्याधुनिक प्रकारचे कुंपण बांधले आहे.

‘रोहयो’चे आकडे काय बोलतात
सध्या सुरू कामे - १,८२२
ग्रामपंचायतीची संख्या - ५०६
मजुरांची संख्या - नऊ हजार १३७
आज अखेर मनुष्यनिर्मिती दिवस - १,६३,५५३

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ७१ हजार लशी उपलब्ध; थांबलेले लसीकरण उद्यापासून

कोरोनाकाळात नऊ हजारांवर मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गत वर्षीही एवढेच मजूर होते. यंदा मजुरी २३८ वरून २४८ एवढी झाल्याने मजुरांमध्ये आनंद आहे. अनेक कामे या योजनेंतर्गत सुरू आहेत.
-प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी
रोजगार हमी योजना

(workers lockdown time mnrega scheme nine thousand employment)