"गिरणा'  नदी वरील  रेल्वे, रस्ते पूलाजवळील वाळू उपश्‍याला आता मनाई ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

गिरणा नदीवरील दोन्ही पूलाच्या बाजूला 600 मीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. 

जळगाव : गिरणा नदीतील रेल्वे पूल व रस्ते पुल परिसरातील 600 मीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी वाळू उपश्‍याला मनाई करण्यात आली आहे. कोणी उपसा करतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यावर दिवसरात्र लक्ष ठेवण्यासाठी पोलीस व महसुल कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे. 

एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. याबाबत त्यांनी म्हटले आहे, कि गिरणा नदीच्या रस्ते व रेल्वे पूलाच्या कोणत्याही बाजूने 600 मीटर क्षेत्र व दोन हजार फुट परिसरात वाळू उपसा करता येणार नाही. गिरणा नदीवरील दोन्ही पूलाच्या बाजूला 600 मीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. 

पथकाची नियुक्ती 
बेकायदा वाळू उपश्‍यावर नियंत्रण करून कारवाई करण्यासाठी महसूल व पोलीसांचे दोन संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक दिवसरात्र या ठिकाणी गस्ती करणार आहे. संबधित अधिकाऱ्यांनी वाळू उपशा होत असतांना दिसल्यास तातडीने कारवाई करावयाची आहे. या पथकाने दिवसातून दोन वेळा भेटी द्यावयाच्या असून रात्रीच्या वेळी पेट्रोलींग करावयाची आहे. उपसा करतांना सापडल्यास वाहन, यंत्रसामुग्री मालकावरही गुन्हा दाखल करावयाचा आहे. यात मंडल अधिकारी पाळथी ए.पी.सोनवणे, मंडल अधिकारी पी.डी.बाविस्कर चांदसर यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले आहे. त्यांना सहकार्यासाही सहा कर्मचारी देण्यात आले आहे. या पथकासमवेत एक पोलीस कॉन्स्टेबल असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girna rivhare higway,train brije Nearby sand dunes are now forbidden

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: