esakal | सोने खरेदी करायला जाताय..आधी भाव तर जाणून घ्‍या 
sakal

बोलून बातमी शोधा

सोने खरेदी करायला जाताय..आधी भाव तर जाणून घ्‍या 

महिन्याभरापूर्वी सोने चांदीच्या भावावर परिणामी झालेला पाहण्यास मिळत होता. त्यात सोने हजार तर चांदी दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरली होती.

सोने खरेदी करायला जाताय..आधी भाव तर जाणून घ्‍या 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ- उतारामुळे गेल्या महिन्याभरापासून सुर्वण बाजारावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून सोने- चांदीचे दरांमध्ये देखील चढ उतार झाल्‍याचे पाहण्यास मिळत होते. याचा परिणाम म्‍हणून गेल्या तीन दिवसात सोने हजार रुपयांनी तर चांदी अडीच हजार रुपयांनी वाढले आहे. 

जळगावची महत्वाची बातमी- गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल; चाकुचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप
 

जळगावची सुर्वण बाजारपेठ राज्यात प्रसिध्द असून येथील २४ कॅरेट शुध्द सोने मिळत असल्याने बाहेरून सोने खरेदीसाठी ग्राहक येत असतात. कोरोनाच्या लाकडाउन काळात मात्र सुवर्ण बाजारपेठ थंडावली होती. बाजारपेठ खुली झाल्याने तसेच दिवाळीत सोने- चांदी खरेदी करण्याचा देखील महुर्त अनेकांनी साधला. आता लग्नसराई सुरू झाल्याने सुवर्ण बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. भाव वधारले असले तरी सुवर्ण खरेदी करण्याचे मंदावलेले नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव चढे 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ- उतार होत असून डॉलर, रुपयांच्या भावात देखील चढउतार होत आहे. त्यात सोने व चांदीची देखील आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने गेल्या तीन- चार दिवसांपासून सोने व चांदीचे भाव वाढले आहे. 

आवश्य वाचा- कांद्याचे दर गडगडणार; काय आहे कारण जाणून घ्‍या 
 

सोने खरेदीची संधी साधली पण 
महिन्याभरापूर्वी सोने चांदीच्या भावावर परिणामी झालेला पाहण्यास मिळत होता. त्यात सोने हजार तर चांदी दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरली होती. मात्र गेल्या तीन दिवसात सोने व चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने एक हजार तर चांदी अडीच हजार रुपयांनी वाढली आहे. 

मागील चार दिवसातील दर असे 
जळगावच्या सुवर्णबाजार पेठेत मंगळवारी सोने ४९ हजार ६०० रुपये प्रतितोळे तर चांदी ६५ हजार किलो भाव होता. बुधवारी सोने ५० हजार तोळे तर चांदी ६६ हजार रुपये किलो. गुरूवारी सोने ५० हजार २०० रुपये तोळे, तर चांदी ६६ हजार रुपये किलो. तर आज ५० हजार ६०० रुपये तोळे तर चांदी ६७ हजार ५०० रुपये किलो असे भाव आहे. 

आवश्य वाचा- दुर्मिळ पांढरा नागाला मिळाले जीवनदान; सर्पमीत्राने शिताफीने पकडून सोडले जंगलात

आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत डॉलर, रुपयांचे भावात चढ- उतार असल्याने सोने चांदीच्या भावांमध्ये देखील बदल होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. आता सोने व चांदीचे भाव आंतराष्ट्रीय बाजारात वाढले असल्याने सोने व चांदीचे भाव गेल्या तीन दिवसात वाढले आहे. लग्नसराई सुरू असल्याने ग्राहकांचे सोने खरेदीवर याचा परिणाम फारसा पडणार नाही. 

- सुशील बाफना, संचालक, आर. सी. बाफना जळगाव. 

loading image