शेतकऱयांसाठी चांगली बातमी; रब्बीसाठी तीन आवर्तने सोडले जाणार 

संजय पाटील
Wednesday, 2 December 2020

तालुक्यात मागील वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, धरणात मुबलक साठा आहे.

पारोळा : यंदा रब्बी हंगामासाठी दोनऐवजी तीन आवर्तने दिली जाणार आहेत, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन, असे चार आवर्तन तालुक्याला दिले जाणार असल्याने शेतकरी व नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. 

आवश्य वाचा- भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे 
 

बोरी वसाहत येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षखाली बोरी मध्यम प्रकल्पासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात ते बोलत होते. 
या वेळी बैठकीस उपविभागीय अभियंता एम. आर. मिठ्ठे, अजिंक्य पाटील, विजय जाधव, टी आर. पाटील, संबधित शाखा अभियंता तसेच कालवा सल्लागार समिती सदस्य रेखा पाटील यांचे प्रतिनिधी डी. के. पाटील, दिलीप पाटील, मनोहर पाटील, संतोष पाटील, किसान पाटील, तसेच कालवा निरीक्षक नाना पाटील, नाना कुमावत, शशिकांत पाटील, देवा पाटील, अतुल पाटील, कमलेश दाबाडे, विलास देवरे, पी. एस. पाटील, दगडू जोशी, भूषण पाटील व पाटबंधारे कर्मचारी तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते. या वेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 

आमदार पाटील म्हणाले, की तालुक्यात मागील वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, धरणात मुबलक साठा आहे. यावर्षी रब्बी हंगामासाठी दोनऐवजी सिंचनासाठी तीन आवर्तने देण्यात यावे. तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन देण्यात यावे, असे सांगितले. 
दरम्यान, यंदा रब्बी हंगामासाठी बोरी मध्यम प्रकल्पातून व उन्हाळी बिगरसिंचन कालव्याद्वारे पाणी देण्याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ध. ब. बेहेरे यांच्या उपस्थितीत निर्णय होऊन मान्यता देण्यात आली. तसेच सर्व शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरुन सिंचन पाणीपट्टी भरणा करण्याबाबत सहकार्य करावे ,असे आवाहन करण्यात आले. व्ही. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पी. जे. काकडे यांनी आभार मानले. 

वाचा- सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार ; ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करणार -

भोकरबारी प्रकल्पातूनही पाणी 
भोकरबारी मध्यम प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार तीन आवर्तने भोकरबारी प्रकल्पासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच यावर्षी रब्बी हंगामासाठी दोनऐवजी सिंचनासाठी तीन आवर्तने द्यावी, असे आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. आवर्तन देण्याबाबत कार्यकारी अभियंता बेहेरे यांच्या उपस्थितीत निर्णय होऊन मान्यता देण्यात आली.  

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon good news for farmers, three cycles will be released for rabbis