esakal | जळगाव ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

 Jalgaon Government Employees Society

जळगाव ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव: येथील बहुचर्चित असलेल्या ग.स. सहकारी सोसायटीच्या (Government Employees Society) सार्वत्रिक निवडणूकीचा (Election) कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आ हे. दि. १८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार असुन दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Cooperative Electoral Authority) जाहीर केले आहे.

हेही वाचा: जळगाव मनपा प्रकरण;नियुक्ती रद्दचा आदेश संभ्रम वाढविणारा

जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सहकारी सोसायटीचा मतदार यादी व निवडणूकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती - दि. १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर, छाननी दि. २६ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र यादी प्रसिध्द करणे दि. २९ नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज माघार- दि. २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर, अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी दि. १४ डिसेंबर, प्रत्यक्ष मतदान दि. २१ डिसेंबर, मतमोजणी दि. २३ डिसेंबर, पदाधिकारी निवड दि. ३१ डिसेंबर.

हेही वाचा: चक्क पोतभर चपला चोरट्यांनी चोरल्या..

बाजार समित्यांच्या निवडणूका पुढील तीन महिन्यात

जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ह्या दि. २३ ऑक्टोबर पासून पुढील तीन महिन्यात घेण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहे.

loading image
go to top