esakal | चक्क पोतभर चपला चोरट्यांनी चोरल्या..
sakal

बोलून बातमी शोधा

Police Arrest

चक्क पोतभर चपला चोरट्यांनी चोरल्या..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केटमधील (Market) चप्पल विक्रेत्याच्या चपलांची गोणीच तिघा भामट्यांनी चोरून (Thief) नेल्याची घटना घडली होती. गुन्हा (Case) दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी (Police) तिन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले. चोरीचा ऐवज जप्तीनंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा: एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल

पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख (वय २७) यांचा फुले मार्केट परिसरात बूट- चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. जुबेरने मंगळवार (ता. २८) दुपारी १२ वाजता मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळच दुकान लावले होते. थोड्याच वेळात जोरदार पावसाचे आगमन होऊन दुकान आवरून सर्व माल त्याने गोणीत भरला होता. नेहमीप्रमाणे त्याने सर्व सहा गोण्या त्याच्या ओळखीच्या दुकान (नं. १२८) जवळ लावून दुकान मालक अजय चौधरी यांना सांगत जुबेर घरी गेला आणि सायंकाळी ५ वाजता परत आला. दुकानाबाहेर ठेवलेल्या गोण्या पहिल्या असता ६ पैकी एक गोणी गायब होती. गोणी चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी १५ हजार २१२ रुपयांच्या चप्पल चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती.

हेही वाचा: बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण


चोरट्यांनी माळ्यावर लपवल्या चपला
निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या यांच्या पथकातील किशोर निकुंभ, संतोष खवले, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर यांना गुप्त माहितीवरून कळाले की, किशोर बाविस्कर हा एक गोणी घेऊन जात असताना त्याला काही नागरिकांनी हटकले होते. संशयिताच्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध सुरु केल्यावर तिघांची माहीत समोर आली. पोलिस पथकाने महेश तायडे (रा. २१ वाल्मिकनगर), शोएब शेख अख्तर (वय ३३, रा. रथ चौक), किशोर बाविस्कर (वय-३१, रा. वाल्मिकनगर) अशा तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महेश तायडे याच्या घराच्या माळ्यावर गोणी ठेवल्याचे कळल्यावरून पंचनामा करून माल जप्त करण्यात आला.

loading image
go to top