
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात घडलेल्या विवीध घटना, घडामोडी आणि त्यावरुन तापलेले राज्याचे राजकारण, परस्पर विरुद्ध आरोप प्रत्यारेाप आणि त्यात राज्यपालांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भुमिका याचा उल्लेख केला आहे.
राज्यपाल कोश्यारींची राष्ट्रपतींकडे तक्रार
जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसींग कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यात यावे; अशी तक्रार थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून शिवसेना पदाधिकारी गजानन मालपुरे यांनी केली आहे.
शिवसेना पदाधिकारी गजानन पुंडलीक मालपुरे यांनी राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात घडलेल्या विवीध घटना, घडामोडी आणि त्यावरुन तापलेले राज्याचे राजकारण, परस्पर विरुद्ध आरोप प्रत्यारेाप आणि त्यात राज्यपालांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भुमिका याचा उल्लेख केला आहे. कोरोना संक्रमण काळात..शासनाने मंदिरे उघडण्या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमुत्र्यांना लिहलेल्या पत्रात आपण हिंदुत्व विसरलात का..असे म्हणणे निंदनिय होते. महाराष्ट्र पोलिसांबाबत सिने अभिनेत्री कंगना रणावतचे वक्तव्य, सुशांतसींग आत्महत्त्या प्रकरण आणि नुकतेच अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना संपर्क करुन गोस्वामी याच्या जिवीताला बरेवाईट होण्याबाबत चिंता व्यक्त करुन त्यांच्या कुटूंबीयांना भेटू देण्याबाबत चर्चा करतात. हा प्रकार अत्याचारीत अन्वय नाईक यांच्या कुटूंबीयांना न्यायापासून वंचित ठेवण्याइतपत गंभीर आहे.
पदाचा अवमान?
राज्यपाला सारख्या संवैधानीक पदावर असतांना गृहमंत्र्यांना असा फोन करणे अर्थातच संशयीत आरेापीला कुठेतरी पाठबळ देणे व पोलिस तपासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ढवळाढवळ करण्यासारखे आहे. या सर्वांमुळे राज्यपाल पदाची गरीमा ढासळून पदाचा अवमान होतोय कि, काय असे चित्र निर्माण झाले आहे. अर्थातच शाहु, फुले, टिळक, आंबेडकरांच्या विचारांना तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी मा. भगतसींग कोश्यारी यांना पदमुक्त करावे अशी मागणी मालपुरे यांच्याकडून करण्यात आली आहे.
Web Title: Marathi News Jalgaon Governor Koshyaris Complaint President
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..